{"title":"Biography","description":"\u003cp\u003eBiography\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"mahapurush-mandela-by-joseph-tuscano","title":"Mahapurush Mandela by Joseph Tuscano","description":"\u003cp\u003eस्वर्गीय नेल्सन रोलिहलाल्ला मंडेला हे दक्षिण आफ्रिका देशाचे पितामह (ताता) होते, जसे मोहनदास करमचंद गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता होते. आपण सारे त्यांना 'बापू' म्हणायचो. तसेच त्यांना 'मदिबा' म्हणून पुकारत. त्यांचे सारे आयुष्य वर्णद्वेषाविरुध्द लढत लढत तुरुंगात गेले. पण जीवनाच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आपले साखळदंड अहिंसक मार्गाने तोडले व ते मुक्त झाले. केवळ हातापायांना जखडणे, साखळदंड तोडणे म्हणजे मुक्ती नव्हे, तर इतरांच्या स्वातंत्र्याची कदर नि आदर करणे म्हणजे खरी मुक्ती होय, असे ते मानीत. मानवतेच्या स्वातंत्र्यासाठी जीवात जीव असेपर्यंत लढायचे हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. त्यांचे निस्वाःर्थी नेतृत्व, आपल्या देशबांधवांप्रती असलेली अनुकंपा आणि त्यांची उदात्त परंपरा यांसाठी ते देशवासियांच्याच नव्हे तर अखिल जगाच्या स्मरणात राहतील. भावी पिढीसाठी त्यांचे त्यागपूर्ण जीवन एक आदर्श आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524735562098,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0581.jpg?v=1756219428"},{"product_id":"hati-hota-shunya-tarihi-by-omkar-mahadev-vartale","title":"Hati Hota Shunya Tarihi by Omkar Mahadev Vartale","description":"\u003cp\u003eमाझ्या वडिलांचे आत्मवृत्त\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवडील घराबाहेर अनेक संकटांशी झुंजत असतात, परिस्थितीशी दोन हात करत असतात, राबत असतात, नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात... कां ? तर घर व्यवस्थित चालावं म्हणून. कुटुंब टिकावे म्हणून.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवडिलांच्या संघर्षाला कसलंही मोजमाप नसतं. अगदी दारिद्याच्या विळख्यातून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठीसुद्धा त्यांच्या संघर्षाची मदत होत असते आणि ती सुद्धा एक यशस्वी कहाणी होऊन लोकांपुढे येत असते. एखाद्या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाने अज्ञानाकडून ज्ञानाकडे किंवा निरक्षरतेकडून साक्षरतेकडे प्रवास केला तरी ती कुटुंबाच्या भाव-विश्वातली खूप मोठी गोष्ट असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा एवढा बदल झाला तरी त्या कुटुंबाच्या कर्त्या म्हणजेच वडिलांची एक यशस्वी संघर्षकथा बनते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवडिलांचा संघर्ष ज्या भुलाने पाहिला तो मुलगा खरंतर भाग्यवानच म्हणायला पाहिजे. मी त्यापैकी एक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या वडिलांच्या आत्मवृत्तस्वरूपी शब्दांचा भारवाहक बनून अशीच एक संघर्ष कहाणी या पुस्तकात मांडली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524771475826,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0559.jpg?v=1753710477"},{"product_id":"aaple-chhatrapati-by-dr-b-g-kunte","title":"Aaple Chhatrapati by Dr B G Kunte","description":"\u003cp\u003eआपले छत्रपती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय संस्कृतीचा एक उच्च मनोरा आहे अशी आपण कल्पना केली तर तो मनोरा बांधला जाण्यात त्याची अंगोपांगे कलाकुसरींनी सजविण्यांत मराठ्यांचा भाग इतर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजेरजवाड्यांप्रमाणेच अतिशय मोलाचा होता. मराठा जातच रांगडी. रानटी जीवनाची तिला सवय झालेली. ऐषआरामापासून ती अगदी अलिप्त. साहजिकच मराठ्यांनी भारताला दिलेली देणगीही तशाच प्रकारची होती. त्यात नाजुक साजुकपणा नव्हता. ताजमहाल नव्हता किंवा फत्तेपूर शिक्रीही नव्हती. मराठी वृत्तीच अशा प्रकारची नव्हती. मराठे प्रत्यक्ष सृष्टीत वावरले. त्यांच्या ध्यानी आले तेच त्यांनी प्रत्यक्षात उतरविले. स्वप्नसृष्टीला ते पारखे होते. जीवनाचा लढा देण्यात त्यांचा जन्म गेला आणि म्हणूनच जीवन जगण्याला ज्या गोष्टी लागतात, ज्यामुळे मन खंबीर बनते, शरीरांत जोम उत्पन्न होतो, रक्त सळसळते अशाच गोष्टींचा वारसा आपण मराठ्यांपासून घेतला. आणि त्यांतच मराठी स्वभावाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524779602290,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0551.jpg?v=1753710865"},{"product_id":"krantiveer-sawarkar-by-mihir-kulkarni","title":"Krantiveer Sawarkar by Mihir Kulkarni","description":"\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्यसंग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका अनन्यसाधारण होती. त्यांनी छत्रपती शिवरायांना आराध्यदैवत मानून ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र प्रतिकार केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. सरदार भगतसिंग, सर मानवेंद्रनाथ रॉय, रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या कित्येक क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते. जॅक्सनवधानंतर अनेक तरुणांची नाहक छळवणूक बघून पकडले जाण्याचा धोका असूनही ते पॅरिसहून लंडनला आले. राष्ट्राच्या सीमा सूतकताईने नव्हे, तर तलवारीच्या टोकाने निश्चित केल्या जातात, ही त्यांची भूमिका आजही लागू पडते. सावरकरांचे विचार मार्गदर्शन हे स्वातंत्र्यपूर्व वा स्वातंत्र्योत्तर काळापुरतेच नव्हते. आजच्या काळात आणि पुढे भविष्यातदेखील ते उपयोगी पडेल.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524819284338,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0543.jpg?v=1753711823"},{"product_id":"narendraparva-by-dr-girish-dabke","title":"Narendraparva by Dr Girish Dabke","description":"\u003cp\u003eप्रांजल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे सुसनं तेज हवं कशाला मीच स्वतः मशाल आहे झगमगाटाचा हव्यास नाही आत्मप्रकाश पुरेसा आहे अंधारस्तंभ छेदून जावा असा विमल प्रकाश आहे संदिग्धाची घृणा आहे स्वच्छ प्रांजल माणूस आहे प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे बारा ग्रहघरात मन रमत नाही भुगाचच कुठेतरी शीर लवत नाही भ्याडांच्या बुद्धिबळावर प्यादं होऊन मरणार नाही मीच माझा पूर्वज आहे मीच माझा वारस आहे प्रारब्धाची अिथे पर्वा कुणाला आव्हानांचा मी माणूस आहे\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524823675250,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0541.jpg?v=1753711919"},{"product_id":"sawarkar-dnyat-ani-adnyat-by-dr-sacchidananda-shevde-durgesh-parulkar","title":"Sawarkar Dnyat ani Adnyat by Dr Sacchidananda Shevde, Durgesh Parulkar","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्यपूर्व कालखंड क्रांतीकार्याने भारलेला होता महत्वाची भूमिका सावरकरांची होती. लोकमान्यांनंतर तरुणांमध्ये राष्ट्रचेतना जागविण्याचे महत्वाचे काम सावरकरांनी केले. राष्ट्राच्या सीमा सूतकताईने नव्हे तर तलवारीच्या टोकाने निश्चित केल्या जातात, अशी त्यांची भूमिका होती. ती आजसुद्धा लागू पडणारी आहे. त्यावेळच्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे कार्य फारसे प्रकाशात आले नाही. वेळोवेळी त्यांचे सावरकरांना झालेले सहकार्य आणि सावरकरांची भूमिका व तरुणांना त्यांचे मार्गदर्शन म्हणजेच ज्ञात आणि अज्ञात सावरकर' होय.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52542863343986,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0721.jpg?v=1754482361"},{"product_id":"chanderi-sitare-by-dr-raju-patodkar","title":"Chanderi Sitare by Dr Raju Patodkar","description":"\u003cp\u003e'चंदेरी सितारे' या पुस्तकातील कलावंताच्या बाबतीत लिहिताना असे म्हणेन की, यातील २५ मान्यवर चंदेरी सिताऱ्यांमध्ये अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, खलनायिका, चरित्र अभिनेता, अभिनेत्री, विनोदी कलावंत, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व घटकांतील मला भावलेले सितारे आहेत. या २५ पैकी २० कलाकारांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर काही जणांसोबत चांगलीच ओळख आहे. चार जणांसोबत अभिनय क्षेत्रात काम केलेले आहे. त्यामूळे एक कलावंत म्हणून त्यांच्या संदर्भात लिहिताना त्यांच्यातील माणूस देखील काही प्रमाणात या लेख मालिकेमध्ये आला आहे. तर पडद्याव्यतिरिक्त त्यांची वेगळी ओळखही त्यातून लिहिण्याचा माझा प्रयत्न राहीला आहे\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543076237682,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0651.jpg?v=1754489228"},{"product_id":"bahirju-naik-by-dr-raj-jadhav","title":"Bahirji Naik by Dr Raj Jadhav","description":"\u003cp\u003eयोग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हा शिवरायांनी माझ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मी हयातभर कधीच मोडला नाही आणि आज हयात नसताना देखील तो मी मोडणार नाही. माझ्या राजांचा आदेश मानूनच मी बोलणार आहे; सर्व काही सांगणार आहे. स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे, असा मी कोणी महानायक किंवा युगपुरुष नाही. इतिहास कथन करू शकेल असा इतिहासकार तर मुळीच नाही; परंतु इतिहासाचे आणि जवळपास सर्वच दोस्त-दुश्मनांचे भेद जाणणारा आणि इतिहासाच्या पानांना माहीत नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीच आहे. इतिहासाने या बहिर्जीची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणारही नाही. कारण इतिहास कधीच गुप्तहेराचा साक्षीदार नसतो; परंतु हा गुप्तहेर बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52546972090738,"sku":null,"price":700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0740.jpg?v=1754641642"},{"product_id":"rafinama-bu-issac-mujawar","title":"Rafinama bu Issac Mujawar","description":"\u003cp\u003eहिंदी सिनेमा संगीताचे शहंशाह-ए-तरन्नुम' असं संबोधले गेलेले मोहम्मद रफी आपल्या सुस्पष्ट, कोमल, मखमली गायकीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांचं नाव उच्चारताक्षणी एक उच्च प्रतीची भावना मनात निर्माण होते. त्यामुळेच अवघ्या संगीतविश्वाने त्यांना भरभरून प्रेम दिलं. संगीत क्षेत्रातील आपल्या अलौकिक कर्तृत्वाने रसिकांच्या चिरस्मरणात असलेल्या रफी साहेबांचा जन्म लाहौर पंजाबमधील कोटला सुल्तानाबादचा. रफी साहेबांना त्यांच्या बालवयात एका फकिराने आपल्या आवाजाने मोहित केलं होतं. संगीताच्या प्रति मोह कदाचित त्यांना त्या फकिराच्या आवाजामुळेच निर्माण झाला होता. रफी साहेब त्या फकिराच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत आणि त्याच्या मागे फिरत. फकिराची ती गाणी गाताना छोट्या रफी साहेबांच्या मनात खास भक्तिभाव निर्माण व्हायचा, ते पाहून त्या फकिराने रफी साहेबांना मनापासून आर्शीवाद दिला, 'बेटा एक दिन तू बडा गायक बनेगा.' आणि खरंच त्या फकिराची भविष्यवाणी खरी ठरली. पुढे हिंदी सिनेमा संगीतात रफी साहेबांनी आपल्या गायनाचे सुवर्णयुग निर्माण केले. सदर पुस्तक त्या साऱ्या रोचक इतिहासाचा आलेख आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52546978316658,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0732.jpg?v=1754641712"},{"product_id":"thor-krantikarak-shivram-hari-rajguru-by-ramakant-deshpande","title":"Thor Krantikarak Shivram Hari Rajguru by Ramakant Deshpande","description":"\u003cp\u003eThor Krantikarak Shivram Hari Rajguru by Ramakant Deshpande\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560001499506,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0933.jpg?v=1756219192"},{"product_id":"sangitachua-va-chitrakalechya-duniyet-by-pt-sujan-rane","title":"Sangitachua Va Chitrakalechya Duniyet by Pt Sujan Rane","description":"\u003cp\u003eपं. सुजन राणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपं. सुजन राणे हे एक व्यावसायिक गायक व चित्रकार आहेत. त्यांना किराणा घराण्याचे प्रसिद्ध गवई पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडून दीर्घ तालीम लाभली आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये आपलं गायन सादर केलं आहे. त्यांपैकी नावाजलेल्या संस्था 'नेहरू सेंटर लंडन', 'बनारस हिंदू विश्वविद्यालय' - वाराणसी, 'कला अकॅडमी' पणजी, गोवा, 'स्वामी विवेकानंद केंद्र'- कन्याकुमारी व 'आय. टी. सी. संगीत रिसर्च अकॅडमी' कलकत्ता येथे. शिवाय त्यांचं 'Learning Hindustani Classical Vocal Music' हे पुस्तक इंग्लडच्या केंब्रिज विश्वविद्यालय, ऑक्सफर्ड विश्वविद्यालय व अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ यु, एस. काँग्रेसमध्ये स्वीकारलं गेलं आहे. त्याचप्रमाणे ते एक उत्तम चित्रकार आहेत. गेल्या ४० वर्षांत त्यांनी अनेक व्यक्तिचित्रं काढली आहेत. त्यांपैकी खालील चित्रं महत्त्वाची आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअमेरिकन रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर पीटर इन्व्हरसो न्यू जर्सी, अमेरिका., स्वामी चिन्मयानंद-चिन्मय मिशन., प्लॅन्सबरो-न्यू जर्सी, अमेरिका., भारतीय रिझर्व बँकेचे उच्च अधिकारी श्री. रमेश प्रधान-न्यू जर्सी, अमेरिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखालील भारतीय व्यक्तींची व्यक्तिचित्रं बनारस हिंदू विश्वविद्यालय व महाराजा सवाजीराव विश्वविद्यालय, बरोडा इथे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउस्ताद अब्दुल करीम खान, उस्ताद बिस्मिल्ला खान, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, श्रीमती हिराबाई बडोदेकर, श्रीमती गंगुबाई हनगल, श्रीमती मोगुबाई कुर्डीकर, पंडित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफिरोज दस्तूर, उस्ताद विलायत खान, उस्ताद तिर्रख्वा व इतर. तसेच त्यांनी रंगवलेलं स्वामी विवेकानंद यांचं मोठं व्यक्तिचित्र त्यांच्या कन्याकुमारी केंद्रात आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560007299442,"sku":null,"price":950.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0909.jpg?v=1756219395"},{"product_id":"kranitivir-chapekar-bandhu-101-goshti-by-ramakant-deshpande","title":"Kranitivir Chapekar Bandhu 101 Goshti by Ramakant Deshpande","description":"\u003cp\u003eKranitivir Chapekar Bandhu 101 Goshti by Ramakant Deshpande\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560013361522,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0931.jpg?v=1755318536"},{"product_id":"majhi-sansaryatra-by-govind-sakharam-sardesai","title":"Majhi Sansaryatra by Govind Sakharam Sardesai","description":"\u003cp\u003eआत्मचरित्राने प्रसिद्धी मिळवण्याइतके माझे चरित्र महत्वाचे नाही, हे मी जाणून आहे, आणि राष्ट्राच्या बौद्धिक संपत्तीत भर घालण्याइतकी माझी ऐपतही नाही. तेव्हा आत्मचरित्र लिहण्याच्या किंवा प्रसिद्ध करण्याच्या भरीस पडणे अनुचित होय असे मी मानतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनुष्याची एकंदर प्रगती पूर्वानुभवावर आधारलेली असते. म्हणून माझ्या जीवनात राष्ट्रपयोगी अंश विशेष नसला तरी प्रत्यक्ष माझे कोटुंबिक, आप्तइष्ट किंवा व्यवहारसंबद्ध व्यक्ती अशांचा वर्गही बराच मोठा असून त्याचा परिणाम माझ्या जीवनावर पुष्कळ झालेला आहे. माझ्या पश्चात 'रियासतकार' एवढेच नाव माहीत असणार म्हणून माझे सर्व अवांतर अनुभव एकत्र लेखबद्ध झालेले जिज्ञासुंना कळणे इष्ट होय असे विचार मनात वारंवार घोळत असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआत्मचरित्र लिहण्याची पुष्कळदा एक प्रथाच पडलेली दिसते ती मला मान्य नाही. आपणांस काही विशिष्ट सांगण्यासारखे नसेल तर आत्मचरित्र लिहण्याच्या भरीस माणसाने पडू नये. बहुमोल टिकाऊ आख्यान मला सांगता आले नाही तरी जे अनुभव किंवा आठवणी थोड्याबहुत उपयुक्त वाटतात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेवढ्याचाच संग्रह मी यात केला आहे\"\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560014442866,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0905.jpg?v=1755319936"},{"product_id":"dr-shyamaprasad-mukherji-by-dr-girish-dabke","title":"Dr Shyamaprasad Mukherji by Dr Girish Dabke","description":"\u003cp\u003eगिरीश दाबके\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवयाच्या केवळ चौतिसाव्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचा कुलपती झालेला गाढा विद्वान. मातृभाषेतूनच शिक्षण असावे हे सांगणारा आणि कुलपती म्हणून ते धोरण अमलात आणणारा द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ. बंगाली, हिंदी आणि उर्दू भाषांच्या विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करणारा शिक्षणमहर्षी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदूमहासभेचे नेतृत्व सावरकरांच्याच धडाडीने आणि कौशल्याने करणारा धुरंधर नेता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतंत्र भारताला औद्योगिक प्रगतीची दिशा देणारा द्रष्टा प्रशासक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतंत्र भारताचा पहिला उद्योग मंत्री.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदूंच्या भीषण कत्तली झाल्या म्हणून केंद्रीय मंत्रीपद सोडणारा निस्पृह आणि निर्भय राजकीय नेता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'काँग्रेसला एक वेगळा राष्ट्रीय पर्याय मी उभा करीन' अशी प्रतिज्ञा करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी 'भारतीय जनसंघा'ची स्थापना करणारा कालजयी राजपुरूष !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमा. अटलजी बलराज मधोक, दीन दयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, लालकृष्ण अडवाणी अशा दिग्गज नेत्यांना घडविणारा श्रेष्ठ राजगुरू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560047702386,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0893.jpg?v=1755319969"},{"product_id":"swarbhogi-dr-vasantrao-deshpande-by-dr-lata-nilkanth-deo","title":"Swarbhogi Dr Vasantrao Deshpande by Dr Lata Nilkanth Deo","description":"\u003cp\u003eडॉ. वसंतराव देशपांडे हे प्रतिभावान चतुरस्त्र गायक, संगीत अभ्यासक उत्तम तबलिये असल्याने गाताना त्यांना सम विनासायास दिसायची, ते समेवर येण्याऐवजी सम त्यांच्याबरोबर यायची. त्यामुळे त्यांच्या गायनातील लयकारी त्यांच्या बुद्धिवैभवाचे दर्शन घडवायची. रागदारी तसेच इतर संगीत प्रकारात त्यांचे सूर, लय, अभ्यास, कल्पकता, रियाज याबरोबरच आलापी, बोलअंग, बोलतान, तान, सरगम अशा विविध गायन गुणांवर प्रभ असल्याने त्यांचे गायन रसिकांना मोहवून टाका संगीतविषयक त्यांचे अफाट वाचन असल्याने त्य अनुभव, विचार निष्कर्ष निश्चित होते. गायन ही कल 'प्रायोगिक कला' आहे याचा त्यांना कधी विसर पडल नाही. त्यामुळे त्यांच्या पोटातील ज्ञान बैठकीत गायनालह रंगतीने फुले, त्यावेळी त्यांच्या पांडित्याला लालित्याची सुंदर किनार लाभल्याचे प्रत्ययास येई आणि श्रोता हरखून जाई ! असा आदरणीय प्रतिभावान चतुरस्त्र गायक कलावंत आता होणे नाही.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560047767922,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0891.jpg?v=1755319974"},{"product_id":"teen-pidhyancha-awaaj-by-isaac-mujawar","title":"Teen Pidhyancha Awaaj by Isaac Mujawar","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राची संस्कृती ही विविध अंगांनी व्यापलेली आहे. त्या अंगांना समृद्ध करणारी अलौकिक व्यक्तिमत्त्वाची माणसं या भूमीत जन्माला आली. त्या व्यक्तींच्या कार्य-कर्तृत्वाचा आलेख वेळोवेळी नवीन पिढीला कळाला पाहिजे म्हणजे त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांना घडू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसंच एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग बनलेलं व्यक्तिमत्त्व जिच्याकडे 'महाराष्ट्राचं मानचिन्ह' म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या योगदानाची मोजपट्टी ठरवणे अशक्य. ती व्यक्ती म्हणजे गानसम्राज्ञी 'लता मंगेशकर.' त्या चित्रपट क्षेत्रातील तीन पिढ्यांचा आवाज बनल्या. त्या लताबाईंच्या गायन कालखंडाचा परिचय, हिंदी-मराठी चित्रपट संगीताचा चालता बोलता इतिहास ज्यांना म्हन्टल जातं ते इसाक मुजावर करून देत जो वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560047833458,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0889.jpg?v=1755319981"},{"product_id":"dwaj-puran-by-rajendra-shelke","title":"Dwaj Puran by Rajendra Shelke","description":"\u003cp\u003eध्वजांचा वापर हा अगदी प्राचीन काळापासून होत असल्याचे दिसून येते. ध्वज हे मानाचे, यशाचे, शौर्याचे व \"आदर्शाचे प्रतीक किंवा चिन्ह मानले गेले आहे. प्राचीन काळी काठीला किंवा भाल्याला एखादी प्रतिमा बांधून ते खुणेचे निशाण तयार करीत. तेच ध्वजाचे आद्यरूप म्हणता येईल. कालौघात ध्वजांची रूपे निरनिराळ्या रंगांनी व चिन्हांनी, आकृत्यांनी, चित्रांनी सजविली जाऊ लागली. उंचावर अग्रभागी फडकणारे ध्वज हे रयतेसाठी उत्तेजक व प्रेरकच ठरले व अशा ध्वजांनी तत्कालीन राजवटींना इतिहासात अजरामर करून टाकले हे निर्विवाद !\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560048128370,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0881.jpg?v=1756219418"},{"product_id":"bill-gates-sanganak-pranalicha-raja-by-dr-anant-p-labhsetwar","title":"Bill Gates Sanganak Pranalicha Raja by Dr Anant P Labhsetwar","description":"\u003cp\u003eआज संपूर्ण जगात सुमारे चारशे दशलक्षाहून अधिक संख्येने संगणक वापरले जातात. त्यातले एकशे पंचवीस दशलक्ष इतके संगणक केवळ भारतात वापरले जातात. संगणक सुरू केल्यानंतर सर्वप्रथम मायक्रोसॉफ्ट कंपनीचं बोधचिन्ह संगणक पटलावर आपल्याला दिसतं. त्यानंतर त्या कंपनीन निर्माण केलेल्या कार्यप्रणालीवर संगणक काम करतो त्या यशस्वी कार्यप्रणालीचा सहसंस्थापक आणि अर्ध्वयू बिल गेट्स आहे हे संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच माहित आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबिल गेट्स गेली काही वर्षं सातत्याने जगातली श्रीमंत व्यक्ती म्हणून गणली गेली आहे. त्यांनी तासाला एक दशलक्ष डॉलर खर्च केले तरी ते संपण्यासाठी शंभर वर्षे जावी लागतील. धनाने श्रीमंत असणारी ही व्यक्ती मनानेदेखील तितकीच श्रीमंत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशाचे शिखर गाठताना मायक्रोसॉफ्ट कंपनीला व त्याच्या अर्ध्वयूंना न सुटणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. मात्र बिल गेट्स यांच्याजवळ असणाऱ्या असामान्य दूरदर्शीपणामुळे आणि अथक कष्टामुळे संपूर्ण जगात ह्या कंपनीला अव्वल स्थान मिळाले. त्या कष्टामागचा बोलका इतिहास म्हणजेच सदर पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560056418674,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0843.jpg?v=1755322239"},{"product_id":"athawanitil-bhai-by-ashok-bhai-sonawane","title":"Athawanitil Bhai by Ashok (Bhai) Sonawane","description":"\u003cp\u003eअशोक (भाई) दशरथ सोनवणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजन्म : भुसावळ-मुळ गाव-दुसरवेडा, ता. यावल, जि. जळगाव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षण : बी.ए., बी.जे. (जर्नालिझम)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपत्ता : \"प्रिमोहि\" शितोळे नगर, जुनी सांगवी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभ्रमणध्वणी : ९९२२५०१६००\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध कार्य :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय जनता पक्ष -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. उपाध्यक्ष, पिं.चिं. शहर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. सरचिटणीस, पिं.चिं. शहर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. नगरसेवक, पिं.चिं. मनपा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. गटनेता, पिं.चिं. मनपा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. सदस्य (शासननियुक्त) शिक्षण मंडळ, पिं.चिं. मनपा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. सदस्य, स्थायी समिती, पिं.चिं. मनपा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. सरचिटणीस, सँडविक एशिया एम्प्लॉइज युनियन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. अध्यक्ष, सँडविक स्पोर्टस् क्लब\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. संस्थापक-अध्यक्ष, खान्देश मित्र मंडळ, सांगवी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मा. संस्थापक-अध्यक्ष, साईप्रसाद ना. सह. पतसंस्था, सांगवी\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560068084082,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0849.jpg?v=1755322219"},{"product_id":"cancer-grasta-tarihi-swastha-by-maya-dharmadhikari","title":"Cancer Grasta Tarihi Swastha by Maya Dharmadhikari","description":"\u003cp\u003e\"गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने रागलोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात !!!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाया धर्माधिकारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंगला गोडबोले\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560088433010,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0837.jpg?v=1756219224"},{"product_id":"shailendra-ani-sahir-shabdachaitanyache-kimayagar-by-vilas-deshmukh","title":"Shailendra Ani Sahir - Shabdachaitanyache Kimayagar by Vilas Deshmukh","description":"\u003cp\u003eशैलेंद्र \u003cmeta charset=\"utf-8\"\u003eआणि साहिर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषतः जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी. लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने \"गाणी सांगणारं \" ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैभव जोशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध कवी आणि गीतकार\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560091971954,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0833.jpg?v=1756219362"},{"product_id":"asta-gandhiyugacha-ani-nantar-by-anant-shankar-ogale","title":"Asta Gandhiyugacha Ani Nantar by Anant Shankar Ogale","description":"\u003cp\u003eभारताच्या इतिहासातली फाळणीची घटना हा सर्वात करूण अध्याय आहे. फाळणीची कारणमीमांसा करीत असताना 'फाळणी आणि गांधीहत्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' हे डॉ. राममनोहर लोहियांचे म्हणणे खरे होते हे लक्षात येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'अस्त गांधी युगाचा आणि नंतर !' यामध्ये गांधी हत्येच्या खटल्याचा सर्वांगीण असा आढावा घेतलेला आहे. इतिहासात रमणाऱ्या वाचकाला खिळवून ठेवणारे हे लेखन आहे यात तिळमात्र शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560095412594,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0829.jpg?v=1756219435"},{"product_id":"mrutyunjay-savitrimai","title":"Mrutyunjay Savitrimai by Dhamapal Mashalkar","description":"\u003cp\u003eभारतीय इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व — \u003cstrong\u003eसावित्रीबाई फुले!\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eत्यांच्या कार्याने भारतीय समाजात परिवर्तनाची क्रांती घडवली. स्त्रीशिक्षण, समानता, सामाजिक न्याय आणि मानवतेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीमाईंचा जीवनप्रवास या पुस्तकात प्रभावी शब्दांत साकारला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. धम्मपाल रेवन माशाळकर \u003c\/strong\u003eलिखित ‘मृत्युंजया सावित्रीमाई’ हे पुस्तक फक्त चरित्र नसून, ती एका युगप्रवर्तक स्त्रीची आत्मकथा आहे जी प्रत्येक वाचकाला प्रेरित करते. शिक्षक, समाजसेवक, कवयित्री आणि लेखिका अशा अनेक भूमिका निभावणाऱ्या सावित्रीमाईंच्या आयुष्याचा सखोल आढावा या ग्रंथात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही कथा आहे दृढनिश्चय, संघर्ष आणि परिवर्तनाची — अशा स्त्रीची जिने मृत्युंजयी होऊन समाजाला शिक्षणाचा दीप दिला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eका वाचावं हे पुस्तक?\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e📖 सावित्रीमाईंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग\u003cbr\u003e🌸 समाजपरिवर्तनातील त्यांचे योगदान जाणून घेण्यासाठी\u003cbr\u003e💪 स्त्रीशक्ती, शिक्षण आणि समानतेचा सशक्त संदेश\u003cbr\u003e🏫 विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि प्रेरणादायी वाचकांसाठी उपयुक्त\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61487943844210,"sku":null,"price":157.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/SAVITRIMAIforshopify.png?v=1767865320"},{"product_id":"bharatache-bhagyavidhate","title":"Bharatache Bhagyavidhate by Babusingh Rathod","description":"\u003cdiv\u003e\u003cstrong\u003eज्यांनी घडवला भारताचा इतिहास, ज्यांच्या विचारांनी उजळली राष्ट्राची दिशा — त्यांना सलाम!\u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eहे पुस्तक भारताच्या इतिहासातील त्या महान नेत्यांना समर्पित आहे ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात, राजकारणात, शिक्षणात, विज्ञानात आणि सामाजिक कार्यात अविस्मरणीय योगदान दिलं.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमहात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, ए. पी. जे. अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी आणि इतर अनेक थोर विभूतींच्या प्रेरणादायी कार्याचा सुंदर आढावा या पुस्तकात आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eलेखक \u003cstrong\u003eबाबुसिंग मोहनसिंग राठोड \u003c\/strong\u003eयांनी अत्यंत साध्या आणि प्रभावी भाषेत भारताचे भाग्य घडवणाऱ्या या महान नेत्यांची कथा सांगितली आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि देशभक्त वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e📚 \u003cstrong\u003eठळक वैशिष्ट्ये:\u003c\/strong\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eभारताच्या प्रमुख नेत्यांच्या जीवनाचा सखोल आढावा\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eप्रेरणादायी आणि शैक्षणिक माहितीने समृद्ध\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eविद्यार्थी, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षार्थींसाठी उपयुक्त\u003c\/div\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61489459200370,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/BhartacheBhagyavidhate.jpg?v=1767954338"},{"product_id":"jara-visavu-ya-valanavar-by-jagdish-saysikamal","title":"Jara Visavu Ya Valanavar by Jagdish Saysikamal","description":"\u003cdiv\u003eजीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर काहीतरी शिकायला मिळतं…\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकधी आनंद, कधी वेदना — आणि त्यातूनच उगवते अनुभूतीची नवी पहाट.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e“\u003cstrong\u003eजरा विसावू या वळणावर\u003c\/strong\u003e…” हे पुस्तक म्हणजे लेखक\u003cstrong\u003e जगदीश सायसिकमल\u003c\/strong\u003e  यांचा जीवनप्रवास, अनुभव आणि चिंतन यांचा हळवा, मनाला भिडणारा प्रवास आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eसरकारी अधिकारी म्हणून काम करताना आलेले विविध प्रसंग, समाजातील बदल, मानवी नात्यांचे अर्थ आणि अंतर्मनातील शांततेचा शोध — हे सर्व या पुस्तकात अत्यंत संवेदनशील भाषेत मांडले आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eलेखकाच्या लेखनात वास्तवाचा गंध आहे आणि अनुभूतीची खोली आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eप्रत्येक लेख, प्रत्येक अनुभव वाचकाला थांबायला, विचार करायला आणि जीवनाकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडतो.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e📖 ठळक वैशिष्ट्ये:\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eजीवनातील अनुभव आणि प्रेरणादायी विचारांचा संग्रह\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eसाध्या भाषेत सांगितलेली अर्थपूर्ण जीवनकथा\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eअंतर्मनाला स्पर्श करणारे लेखन\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eप्रत्येक वाचकाला विचारप्रवृत्त करणारे चिंतनशील पुस्तक\u003c\/div\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61490301108594,"sku":null,"price":349.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/yavalanavar_260108_185457.jpg?v=1768033215"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/biography.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}