{"title":"Cinema","description":"\u003cp\u003eCinema\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"suvarnayugatil-surel-dashak-by-vilas-deshmukh","title":"Suvarnayugatil Surel Dashak by Vilas Deshmukh","description":"\u003cp\u003eसिनेसंगीताची सुरेल 'साठ'वण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी सिनेगीतांच्या बाबतीतला संदर्भकोश म्हणता येईल, असा माझा मित्र विलास देशमुख याचे हे सुरेल पुस्तक. १९६०चे दशक हिंदी सिनेसंगीताच्या दृष्टीने सर्वंकष समृद्धीचं होतं. उत्तमाचा ध्यास असलेले अभिनेते-अभिनेत्री, गीतकार- संगीतकार, गायक-गायिका यांचा शतरंगी ताटवाच सजला होता. त्या काळातल्या ब्लॅक \u0026amp; व्हाईट चित्रपटांची मोहिनी आजही टिकून आहे, यातच या दशकाचं रहस्य दडलंय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक सिनेगीतं आपण सहज गुणगुणतो पण त्यांची रचना, संगीत आणि अभिनय चटकन आठवतोच असं नाही. या पुस्तकातून मनोरंजनाबरोबरच दुर्मीळ माहितीचा खजिनाही वाचकांच्या हाती येईल. आपल्या आवडत्या गाण्यांचा संपूर्ण अर्थ त्यातून उमगेल. विलासने हे पुस्तक लिखाणाचा एक भागच होऊन लिहिलंय असं जाणवतं आणि म्हणून त्या काळात लेखक जितका रमला, तितकाच वाचकही मश्गूल होईल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52520882635122,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0603.jpg?v=1753541721"},{"product_id":"yadoon-ki-barat-by-shirish-kanekar","title":"Yadoon Ki Barat by Shirish Kanekar","description":"\u003cp\u003eYadoon Ki Barat by Shirish Kanekar\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52542864458098,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0717.jpg?v=1754482371"},{"product_id":"open-theater-by-dilip-thakur","title":"Open Theater by Dilip Thakur","description":"\u003cp\u003eबहुरंगी बहुढंगी अशी आपली चित्रपटसृष्टी 'ओपन थिएटर' च जणू! पडद्यावर व पडद्यामागे सतत इतके व असे काही घडत असते की माहिती व मनोरंजनाचा मनसोक्त खुराकच. कधी आनंदून जावे कधी भावूकही व्हावे. फ्लॅशबॅकमधे डोकवावे. नव्याचा शोधही घ्यावा. हरखून जावे व भानावरही रहावे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिलीप ठाकूर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रपट विश्लेषक\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543061983602,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0663.jpg?v=1754488583"},{"product_id":"suvarnayugachya-paulkhuna-by-vilas-deshmukh","title":"Suvarnayugachya Paulkhuna by Vilas Deshmukh","description":"\u003cp\u003e१९७० ते १९८१ : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार राजेश खन्ना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि अमिताभ बच्चन यांचा साम्राज्यकाळ म्हणता येईल असा कालखंड !! जोडीला अर्थपूर्ण गीतं आणि सुमधुर संगीत यामुळे हा काळ सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या काळातील अभिनेते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायक यांचा प्रवास उलगडणारा हा रंजक इतिहास वाचकांना अलगद पाच दशकं मागे नेतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुवर्णयुगाच्या पाऊलखुणा वाचताना चित्रपट व त्यांचं संगीत बनवण्यामागची कहाणी, कलाकारांचे रोचक किस्से व शेकडो गाणी वाटेत भेटतात आणि त्यामुळे बारा वर्षांचा हा प्रवास सुखद आठवणी जागवणारा ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543064998258,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0659.jpg?v=1756219337"},{"product_id":"chanderi-sitare-by-dr-raju-patodkar","title":"Chanderi Sitare by Dr Raju Patodkar","description":"\u003cp\u003e'चंदेरी सितारे' या पुस्तकातील कलावंताच्या बाबतीत लिहिताना असे म्हणेन की, यातील २५ मान्यवर चंदेरी सिताऱ्यांमध्ये अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, खलनायिका, चरित्र अभिनेता, अभिनेत्री, विनोदी कलावंत, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व घटकांतील मला भावलेले सितारे आहेत. या २५ पैकी २० कलाकारांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर काही जणांसोबत चांगलीच ओळख आहे. चार जणांसोबत अभिनय क्षेत्रात काम केलेले आहे. त्यामूळे एक कलावंत म्हणून त्यांच्या संदर्भात लिहिताना त्यांच्यातील माणूस देखील काही प्रमाणात या लेख मालिकेमध्ये आला आहे. तर पडद्याव्यतिरिक्त त्यांची वेगळी ओळखही त्यातून लिहिण्याचा माझा प्रयत्न राहीला आहे\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543076237682,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0651.jpg?v=1754489228"},{"product_id":"theataratil-talya-shitya-by-dilip-thakur","title":"Theataratil Talya Shitya by Dilip Thakur","description":"\u003cp\u003eचित्रपट संस्कृतीत दिग्दर्शक\/निर्माता\/ गीतकार\/संगीतकार\/गायक\/वादक कलाकार\/तंत्रज्ञ\/कामगार\/स्टुडिओ\/ प्रदर्शक\/वितरक\/थिएटर्स\/मल्टीप्लेक्स\/ पूर्वप्रसिध्दी \/ समिक्षा याबरोबरच रसिकही महत्वाचे. चित्रपटाच्या यशापयशात त्यांची 'भूमिका' महत्वाची. यह पब्लिक है, सब जानती है... असा हा मामला आहे आणि आपल्या 'चित्रपट प्रेक्षक संस्कृती'चे रंगढंग बहुस्तरीय. आवडलेला चित्रपट (बोली भाषेत पिक्चर) हे प्रेक्षक पडद्यावरच न ठेवता डोक्यात आणि डोक्यावर घेतात. टाळ्या शिट्ट्यांनी थिएटर गाजवतात आणि आपल्याला न आवडलेला चित्रपट ते फार काळ पडद्यावर राहू देत नाहीत. तो रिकाम्या खुर्थ्यांसमोर दाखवावा लागतो. या प्रवासात प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचण्याच्या पध्दतीत वाढ होत गेली. फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट अनेक फिल्मवाल्यांचे टेन्शन वाढवते. काही फिल्मवाले तर म्हणतात, प्रेक्षक हाच खरा समिक्षक. आणि ते चित्रपटाचे भवितव्य घडवतात तेव्हा हे योग्यही वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543077286258,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0649.jpg?v=1754489366"},{"product_id":"shailendra-ani-sahir-shabdachaitanyache-kimayagar-by-vilas-deshmukh","title":"Shailendra Ani Sahir - Shabdachaitanyache Kimayagar by Vilas Deshmukh","description":"\u003cp\u003eशैलेंद्र \u003cmeta charset=\"utf-8\"\u003eआणि साहिर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषतः जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी. लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने \"गाणी सांगणारं \" ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैभव जोशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध कवी आणि गीतकार\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560091971954,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0833.jpg?v=1756219362"},{"product_id":"cinema-khidki","title":"Cinema Khidki by Dilip Thakur","description":"\u003cp class=\"p1\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e🎬 \u003c\/span\u003e\u003cb\u003eसिनेमाच्या पडद्यामागील जग तुमच्यासाठी उघडणारे पुस्तक!\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cstrong\u003e\u003ci\u003eसिनेमा खिडकी\u003c\/i\u003e \u003c\/strong\u003eहे केवळ पुस्तक नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. लोकप्रिय चित्रपट पत्रकार व अभ्यासक \u003cspan class=\"s2\"\u003e\u003cb\u003eदिलीप ठाकूर\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e यांनी आपल्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि सखोल अभ्यासातून सिनेमा विश्वाची खिडकी वाचकांसाठी उघडली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eया पुस्तकातून तुम्हाला मिळेल –\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ मराठी व हिंदी सिनेमाचा प्रवास\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ गाजलेल्या चित्रपटांमागील कथा\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ कलाकार, दिग्दर्शक आणि संगीताचे सूक्ष्म पैलू\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✨ सिनेमा समाज, संस्कृती आणि माणसावर कसा प्रभाव टाकतो याचे विश्लेषण\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e🎞️ जुने आठवणींचे चित्रपट असोत किंवा नव्या काळातील सिनेमा – \u003ci\u003eसिनेमा खिडकी\u003c\/i\u003e तुम्हाला पडद्यापलीकडचे सत्य, भावना आणि अर्थ समजून घेण्याची संधी देते.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e📚 \u003c\/span\u003e\u003cb\u003eकोणासाठी योग्य?\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ चित्रपटप्रेमी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ सिनेमा अभ्यासक व विद्यार्थी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ वाचनप्रेमी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003e✔️ कला, संस्कृती आणि समाज यात रस असणारे वाचक\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p3\"\u003e\u003cspan class=\"s1\"\u003e👉 \u003c\/span\u003e\u003cb\u003eसिनेमावर प्रेम असलेल्यांनी हे पुस्तक नक्कीच संग्रही ठेवावे.\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61487958131058,"sku":null,"price":279.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/cinemakhichdicoverconvertedlayer_260108_133357.png?v=1767866731"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/cinema.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}