{"title":"History","description":"\u003cp\u003eHistory\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"kalchakra-punyache-by-saket-dev","title":"Kalchakra Punyache by Saket Dev","description":"\u003cp\u003eपुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण घटितांचा, काल्पनिक कथांच्या माध्यमातून ससंदर्भ मागोवा घेणारा कथासंग्रह !\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524758270322,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0567.jpg?v=1756219468"},{"product_id":"bhatkanti-prachin-leni-va-mandiranchi-by-sushil-dudhane","title":"Bhatkanti Prachin Leni Va Mandiranchi by Sushil Dudhane","description":"\u003cp\u003eघाटवाटांवर दोन पुस्तके व गडभटकंतीवर एक पुस्तक लिहिल्यावर मी अनोखी भटकंती करायचे ठरविले. या भटकंतीत प्राचीन लेणी, प्राचीन मंदिरे, वाडे, अपरिचित व दुर्लक्षित भुयारे व डोंगर या सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन याची अभ्यासपूर्ण माहिती वाचकांपर्यंत, भटक्या मंडळींपर्यंत एका सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून पुस्तक स्वरूपात आपणा समोर घेऊन आणण्याचा संकल्प केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया भटकंती मधूनच 'भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची' हा पुस्तकरूपी खजिना आपल्या संग्रही विराजमान होण्यास घेऊन आलो आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात अपरिचित मंदिरे, लेणी, प्राचीन भुयारे यांची एक सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून माहिती दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेणी म्हणजे नक्की काय? लेणी ही संज्ञा कधी अस्तित्वात आली? लेणी कोणत्या शतकात उदयास आली?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंदिरे याचा अर्थ काय? मंदिरे कोणत्या काळातील आहेत? मंदिरातीत आतील व बाहेरील भागातील ठिकाणांना काय म्हणतात? मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर ओट्यावर का बसावे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52524805718386,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0547.jpg?v=1753711604"},{"product_id":"gova-muktisangram-by-dr-sacchindananda-shevde-durgesh-parulkar","title":"Gova Muktisangram by Dr Sacchindananda Shevde, Durgesh Parulkar","description":"\u003cp\u003eपाचशे वर्षापूर्वी गोमंतकाच्या पवित्र भूमीवर पोर्तुगिजांचे पांढरे पाऊल पडले... आणि मग पाशवी धर्मांधांचा नंगा नाच चालू झाला... सैतानालाही लाज वाटेल असे भयानक छळसत्र चालू झाले... अमानुष शिक्षा व बाटवाबाटवीला ऊत आला... सत्ताधारी माजले आणि जनता अगतिक झाली. शिव-शंभूमुळे धर्मांतराला वेसण घातली गेली... पुढे १९४७ मधे हिंदुस्थान स्वतंत्र झाला. पण गोवा...? सामान्य जनतेने केलेल्या उठावामुळे गोवा स्वतंत्र झाला... त्या छळा- बळाची व मुक्तिसंग्रामाची ही धगधगती गाथा...\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52546967077234,"sku":null,"price":330.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0745.jpg?v=1754639132"},{"product_id":"bahirju-naik-by-dr-raj-jadhav","title":"Bahirji Naik by Dr Raj Jadhav","description":"\u003cp\u003eयोग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हा शिवरायांनी माझ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मी हयातभर कधीच मोडला नाही आणि आज हयात नसताना देखील तो मी मोडणार नाही. माझ्या राजांचा आदेश मानूनच मी बोलणार आहे; सर्व काही सांगणार आहे. स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे, असा मी कोणी महानायक किंवा युगपुरुष नाही. इतिहास कथन करू शकेल असा इतिहासकार तर मुळीच नाही; परंतु इतिहासाचे आणि जवळपास सर्वच दोस्त-दुश्मनांचे भेद जाणणारा आणि इतिहासाच्या पानांना माहीत नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीच आहे. इतिहासाने या बहिर्जीची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणारही नाही. कारण इतिहास कधीच गुप्तहेराचा साक्षीदार नसतो; परंतु हा गुप्तहेर बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52546972090738,"sku":null,"price":700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0740.jpg?v=1754641642"},{"product_id":"bharatache-bhagyavidhate","title":"Bharatache Bhagyavidhate by Babusingh Rathod","description":"\u003cdiv\u003e\u003cstrong\u003eज्यांनी घडवला भारताचा इतिहास, ज्यांच्या विचारांनी उजळली राष्ट्राची दिशा — त्यांना सलाम!\u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eहे पुस्तक भारताच्या इतिहासातील त्या महान नेत्यांना समर्पित आहे ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात, राजकारणात, शिक्षणात, विज्ञानात आणि सामाजिक कार्यात अविस्मरणीय योगदान दिलं.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमहात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, ए. पी. जे. अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी आणि इतर अनेक थोर विभूतींच्या प्रेरणादायी कार्याचा सुंदर आढावा या पुस्तकात आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eलेखक \u003cstrong\u003eबाबुसिंग मोहनसिंग राठोड \u003c\/strong\u003eयांनी अत्यंत साध्या आणि प्रभावी भाषेत भारताचे भाग्य घडवणाऱ्या या महान नेत्यांची कथा सांगितली आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि देशभक्त वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e📚 \u003cstrong\u003eठळक वैशिष्ट्ये:\u003c\/strong\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eभारताच्या प्रमुख नेत्यांच्या जीवनाचा सखोल आढावा\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eप्रेरणादायी आणि शैक्षणिक माहितीने समृद्ध\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e•\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003eविद्यार्थी, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षार्थींसाठी उपयुक्त\u003c\/div\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":61489459200370,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/BhartacheBhagyavidhate.jpg?v=1767954338"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/history.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}