{"title":"Music","description":"\u003cp\u003eMusic\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"suvarnayugatil-surel-dashak-by-vilas-deshmukh","title":"Suvarnayugatil Surel Dashak by Vilas Deshmukh","description":"\u003cp\u003eसिनेसंगीताची सुरेल 'साठ'वण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी सिनेगीतांच्या बाबतीतला संदर्भकोश म्हणता येईल, असा माझा मित्र विलास देशमुख याचे हे सुरेल पुस्तक. १९६०चे दशक हिंदी सिनेसंगीताच्या दृष्टीने सर्वंकष समृद्धीचं होतं. उत्तमाचा ध्यास असलेले अभिनेते-अभिनेत्री, गीतकार- संगीतकार, गायक-गायिका यांचा शतरंगी ताटवाच सजला होता. त्या काळातल्या ब्लॅक \u0026amp; व्हाईट चित्रपटांची मोहिनी आजही टिकून आहे, यातच या दशकाचं रहस्य दडलंय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक सिनेगीतं आपण सहज गुणगुणतो पण त्यांची रचना, संगीत आणि अभिनय चटकन आठवतोच असं नाही. या पुस्तकातून मनोरंजनाबरोबरच दुर्मीळ माहितीचा खजिनाही वाचकांच्या हाती येईल. आपल्या आवडत्या गाण्यांचा संपूर्ण अर्थ त्यातून उमगेल. विलासने हे पुस्तक लिखाणाचा एक भागच होऊन लिहिलंय असं जाणवतं आणि म्हणून त्या काळात लेखक जितका रमला, तितकाच वाचकही मश्गूल होईल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52520882635122,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0603.jpg?v=1753541721"},{"product_id":"sangitachua-va-chitrakalechya-duniyet-by-pt-sujan-rane","title":"Sangitachua Va Chitrakalechya Duniyet by Pt Sujan Rane","description":"\u003cp\u003eपं. सुजन राणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपं. सुजन राणे हे एक व्यावसायिक गायक व चित्रकार आहेत. त्यांना किराणा घराण्याचे प्रसिद्ध गवई पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडून दीर्घ तालीम लाभली आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये आपलं गायन सादर केलं आहे. त्यांपैकी नावाजलेल्या संस्था 'नेहरू सेंटर लंडन', 'बनारस हिंदू विश्वविद्यालय' - वाराणसी, 'कला अकॅडमी' पणजी, गोवा, 'स्वामी विवेकानंद केंद्र'- कन्याकुमारी व 'आय. टी. सी. संगीत रिसर्च अकॅडमी' कलकत्ता येथे. शिवाय त्यांचं 'Learning Hindustani Classical Vocal Music' हे पुस्तक इंग्लडच्या केंब्रिज विश्वविद्यालय, ऑक्सफर्ड विश्वविद्यालय व अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ यु, एस. काँग्रेसमध्ये स्वीकारलं गेलं आहे. त्याचप्रमाणे ते एक उत्तम चित्रकार आहेत. गेल्या ४० वर्षांत त्यांनी अनेक व्यक्तिचित्रं काढली आहेत. त्यांपैकी खालील चित्रं महत्त्वाची आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअमेरिकन रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर पीटर इन्व्हरसो न्यू जर्सी, अमेरिका., स्वामी चिन्मयानंद-चिन्मय मिशन., प्लॅन्सबरो-न्यू जर्सी, अमेरिका., भारतीय रिझर्व बँकेचे उच्च अधिकारी श्री. रमेश प्रधान-न्यू जर्सी, अमेरिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखालील भारतीय व्यक्तींची व्यक्तिचित्रं बनारस हिंदू विश्वविद्यालय व महाराजा सवाजीराव विश्वविद्यालय, बरोडा इथे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउस्ताद अब्दुल करीम खान, उस्ताद बिस्मिल्ला खान, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, श्रीमती हिराबाई बडोदेकर, श्रीमती गंगुबाई हनगल, श्रीमती मोगुबाई कुर्डीकर, पंडित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफिरोज दस्तूर, उस्ताद विलायत खान, उस्ताद तिर्रख्वा व इतर. तसेच त्यांनी रंगवलेलं स्वामी विवेकानंद यांचं मोठं व्यक्तिचित्र त्यांच्या कन्याकुमारी केंद्रात आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560007299442,"sku":null,"price":950.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0909.jpg?v=1756219395"},{"product_id":"swarbhogi-dr-vasantrao-deshpande-by-dr-lata-nilkanth-deo","title":"Swarbhogi Dr Vasantrao Deshpande by Dr Lata Nilkanth Deo","description":"\u003cp\u003eडॉ. वसंतराव देशपांडे हे प्रतिभावान चतुरस्त्र गायक, संगीत अभ्यासक उत्तम तबलिये असल्याने गाताना त्यांना सम विनासायास दिसायची, ते समेवर येण्याऐवजी सम त्यांच्याबरोबर यायची. त्यामुळे त्यांच्या गायनातील लयकारी त्यांच्या बुद्धिवैभवाचे दर्शन घडवायची. रागदारी तसेच इतर संगीत प्रकारात त्यांचे सूर, लय, अभ्यास, कल्पकता, रियाज याबरोबरच आलापी, बोलअंग, बोलतान, तान, सरगम अशा विविध गायन गुणांवर प्रभ असल्याने त्यांचे गायन रसिकांना मोहवून टाका संगीतविषयक त्यांचे अफाट वाचन असल्याने त्य अनुभव, विचार निष्कर्ष निश्चित होते. गायन ही कल 'प्रायोगिक कला' आहे याचा त्यांना कधी विसर पडल नाही. त्यामुळे त्यांच्या पोटातील ज्ञान बैठकीत गायनालह रंगतीने फुले, त्यावेळी त्यांच्या पांडित्याला लालित्याची सुंदर किनार लाभल्याचे प्रत्ययास येई आणि श्रोता हरखून जाई ! असा आदरणीय प्रतिभावान चतुरस्त्र गायक कलावंत आता होणे नाही.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560047767922,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0891.jpg?v=1755319974"},{"product_id":"teen-pidhyancha-awaaj-by-isaac-mujawar","title":"Teen Pidhyancha Awaaj by Isaac Mujawar","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राची संस्कृती ही विविध अंगांनी व्यापलेली आहे. त्या अंगांना समृद्ध करणारी अलौकिक व्यक्तिमत्त्वाची माणसं या भूमीत जन्माला आली. त्या व्यक्तींच्या कार्य-कर्तृत्वाचा आलेख वेळोवेळी नवीन पिढीला कळाला पाहिजे म्हणजे त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांना घडू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसंच एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग बनलेलं व्यक्तिमत्त्व जिच्याकडे 'महाराष्ट्राचं मानचिन्ह' म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या योगदानाची मोजपट्टी ठरवणे अशक्य. ती व्यक्ती म्हणजे गानसम्राज्ञी 'लता मंगेशकर.' त्या चित्रपट क्षेत्रातील तीन पिढ्यांचा आवाज बनल्या. त्या लताबाईंच्या गायन कालखंडाचा परिचय, हिंदी-मराठी चित्रपट संगीताचा चालता बोलता इतिहास ज्यांना म्हन्टल जातं ते इसाक मुजावर करून देत जो वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560047833458,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0889.jpg?v=1755319981"},{"product_id":"shailendra-ani-sahir-shabdachaitanyache-kimayagar-by-vilas-deshmukh","title":"Shailendra Ani Sahir - Shabdachaitanyache Kimayagar by Vilas Deshmukh","description":"\u003cp\u003eशैलेंद्र \u003cmeta charset=\"utf-8\"\u003eआणि साहिर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषतः जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी. लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने \"गाणी सांगणारं \" ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैभव जोशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध कवी आणि गीतकार\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52560091971954,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0923\/8537\/8674\/files\/IMG_0833.jpg?v=1756219362"}],"url":"https:\/\/navinyaprakashan.com\/collections\/music.oembed","provider":"Navinya Prakashan","version":"1.0","type":"link"}