Navinya Prakashan
Aaple Chhatrapati by Dr B G Kunte
Aaple Chhatrapati by Dr B G Kunte
Couldn't load pickup availability
आपले छत्रपती
भारतीय संस्कृतीचा एक उच्च मनोरा आहे अशी आपण कल्पना केली तर तो मनोरा बांधला जाण्यात त्याची अंगोपांगे कलाकुसरींनी सजविण्यांत मराठ्यांचा भाग इतर
राजेरजवाड्यांप्रमाणेच अतिशय मोलाचा होता. मराठा जातच रांगडी. रानटी जीवनाची तिला सवय झालेली. ऐषआरामापासून ती अगदी अलिप्त. साहजिकच मराठ्यांनी भारताला दिलेली देणगीही तशाच प्रकारची होती. त्यात नाजुक साजुकपणा नव्हता. ताजमहाल नव्हता किंवा फत्तेपूर शिक्रीही नव्हती. मराठी वृत्तीच अशा प्रकारची नव्हती. मराठे प्रत्यक्ष सृष्टीत वावरले. त्यांच्या ध्यानी आले तेच त्यांनी प्रत्यक्षात उतरविले. स्वप्नसृष्टीला ते पारखे होते. जीवनाचा लढा देण्यात त्यांचा जन्म गेला आणि म्हणूनच जीवन जगण्याला ज्या गोष्टी लागतात, ज्यामुळे मन खंबीर बनते, शरीरांत जोम उत्पन्न होतो, रक्त सळसळते अशाच गोष्टींचा वारसा आपण मराठ्यांपासून घेतला. आणि त्यांतच मराठी स्वभावाचे वैशिष्ट्य आहे.

