Navinya Prakashan
Aata Me Kay Karu by Dr Shashank Kulkarni
Aata Me Kay Karu by Dr Shashank Kulkarni
Couldn't load pickup availability
दुदैवाने आपल्या समाजात अशा कित्येक व्यक्ती आहेत की त्यांनी आपल्या क्षमतांचा पुर्ण वापर न करताच आपले जीवन संपवले. त्यांच्यामध्ये असणारे गुण, प्रतिभा यांचा योग्य पद्धतीने वापर होऊ शकला नाही. त्यांच्या बीजरूपी शक्ती योग्य वापराच्या अभावामुळे सुप्त अवस्थेत राहिल्या. त्यांचा त्या व्यक्तींना, समाजाला म्हणावा तेवढा उपयोग होऊ शकला नाही. हे आपणा सर्वांचे किती मोठे व भरुन न येणारे नुकसान नाही का? आणि याला कारण होते की 'आता मी काय करू?' या मुलभूत प्रश्नाला ते यथायोग्य प्रतिसाद देऊ शकले नाहीत व कालांतराने ते या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत गेले.
या पुस्तकाच्या माध्यमातून 'आता मी काय करु?' या महत्वपुर्ण प्रश्नाच्या समर्पक, यथायोग्य उत्तर प्राप्तीसाठी व्यक्ती सक्षम कशी होऊ शकेल याचे सखोल चिंतन केले गेले आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर सतत पडणाऱ्या या प्रश्नाला करियर निवडण्या अगोदरच नीट समजाऊन घेणे, त्यातील बारकावे, खाचाखोचा अभ्यासणे व कोणताही न्युनगंड न बाळगता या प्रश्नाला यशस्वीपणे सामोरे जाण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसीत करणे हाच या पुस्तक लेखनामागील उद्देश आहे.

