Navinya Prakashan
Arakshan Yodha by Manohar Parimal
Arakshan Yodha by Manohar Parimal
Couldn't load pickup availability
या लेखनाचा हेतू मराठा करण आदार सफलता, विफलता नाहीच आहे. हि एक मध्यमवर्गीय आणि आर्थिक निम्न वर्गीय तरुण तरूणीच्या भावविश्वाचा आणि त्या तरूणावर अवलंबून कुटुंबाचा, भोवतालची व्यवस्था कसा चुराडा करते हे सांगणारी कथा आहे. तितकाच तिचा हेतू आहे आणि तो पुरेसा सफल झालेला आहे.
व्यक्तीच्या छोट्या छोट्या सामान्य आशा, अपेक्षा देखील ही व्यवस्था आणि तिला ओरबडणारे राजकारणी, तिचेच लांगुलचालन करणाऱ्या असंवेदनशील, छळवादी केल्या गेलेल्या व्यक्ती कशा उध्वस्त करतात आणि माणसाला हतबल करून सोडत जीवन संपवून घ्यायला कसे प्रवृत्त करतात त्याचे हे दर्शन आहे.
क्रूर झालेली व्यवस्था आणि तीच्यापुढे हतबल होत, जीवन जगू न शकणारा माणूस या कोंडीची ही कहाणी आहे. सर्वसामान्य वाचकांना रुचेल, पटेल आणि अनेकांना तर आपलीच ही कहाणी वाटेल इतकी प्रातिनिधिकता या कादंबरीला प्राप्त झाली आहे. या कादंबरीसकट मनोहर परिमल यांच्या अगोदरच्याही तीन कादंबऱ्यांनी या लेखकाचे स्थान मराठी कादंबरी वाङ्मयात सुनिश्चित केले गेले आहे.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी,

