Navinya Prakashan
Arogyam Dhanasampada by Dr Sanjay D Sadavarte
Arogyam Dhanasampada by Dr Sanjay D Sadavarte
Couldn't load pickup availability
आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्चा जीवनात प्रत्येकजण हा अगदी किरकोळ त्रासापासून ते कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला सामोरा जाताना दिसतो.
अशा वेळी कोणताही आजार मूळातच होऊच नये यासाठी संपूर्ण जग हे आपल्या आयुर्वेद शास्त्राकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे.
माझ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या पुस्तकात आयुर्वेदाची तोंडओळख, आयुर्वेद सिद्धांत, आहार पद्धतीबद्दल माहीती, निवडक वनस्पतींची माहीती व उपयोग, काही आजार व त्यावरील घरगुती उपचार आणि मला काही सुचलेले, काही अनुभवलेले मनातील लेख या सर्वांचा उहापोह केला आहे.
माझ्या 'आरोग्यम् धनसंपदा' या पुस्तकाचा उपयोग आपल्यासारख्या सुज्ञ वाचकास निश्चित होईल, तसेच आरोग्याची देवता भगवान धन्वंतरीचे वास्तव्य कायम आपणासोबत राहो हिच धन्वंतरीचरणी प्रार्थना!

