Navinya Prakashan
Arogyasathi Mudra Vidnyan by Dr Madhukar Krushna Desale
Arogyasathi Mudra Vidnyan by Dr Madhukar Krushna Desale
Couldn't load pickup availability
'आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान' या पुस्तकरूपाने आपणापुढे सादर होताना मनस्वी आनंद होत आहे. जीवनशैलीचे एक उपयोजन म्हणून मी पाहतो. मुद्रा महणजे काय? विधी काय? लाभ काय? इ. प्रश्नांची उत्तरे कृती रूपाने देण्याचा प्रयत्न या लेखनातून केला आहे. अँटी ऑक्सीडंटचे प्रमाण वाढवून रोग प्रतिबंधक शक्ती वाढणे यासाठी विनाऔषधाचा मार्ग म्हणजे मुद्रांचा अभ्यास होय. हे मध्यवर्ती सूत्र लक्षात घेऊन लिखाण केले आहे. आपल्यातील चैतन्यशक्तीचे संवर्धन करणे, विविध तज्ज्ञांचे मुद्राविषयी मते प्रणाली, प्रमाण ग्रंथ, मुद्रांविषयी संशोधन ग्रंथित केले आहे. मुद्रा विषय येथे आरोग्य संवर्धनासाठी उपयोजन स्वरूपात घेतला आहे. अलीकडे या विषयात संशोधन होऊ लागले आहे, ही समाधानाची बाब आहे. हृटतत्त्व कौमुदी, घेरंड संहिता व शारदा तिलक हे पुरातन संदर्भ ग्रंथ निश्चितच अभ्यास विषय आहेत. मुद्रांचे वर्गीकरण, मुद्रांचे प्रकार, आरोग्य रक्षण ते सु- आरोग्य लाभणे याबाबत सदर पुस्तकात प्रकरणनिहाय ऊहापोह केला आहे. मुद्रांचा अभ्यास ही स्वतःसाठी व संपर्कातील इतरेजनांचे स्वास्थ्यासाठी एक प्रयोगशाला, देवी औषधालयेच आहेत. याचा प्रत्यय वाचकांना निश्चित होऊ लागेल. आरोग्यासाठी मुद्रा, तत्त्वप्रधान मुद्रा, प्राणमुद्रा, विकृतीनुरूप मुद्रा, व्यक्तिविकासासाठी मुद्रा व आध्यात्मिक उंची वाढणेसाठी मुद्रा हा एक सन्मार्ग आहे. या अनुरूप लेखन केले आहे, याचे निश्चित स्वागत होईल ही खात्री आहे.

