Navinya Prakashan
Aavel by Vrunda Diwan
Aavel by Vrunda Diwan
Regular price
Rs. 190.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 190.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
अवेळ
तिच्या मनात आले... आता ह्या वळणावर मी आणि चिन्मयी आहोत. हे सत्य आहे. पण अजून काही वर्षांनी चिन्मयीही जाईल, मला सोडून. तिच्या, वाटेने. ते वळणही पुन्हा एकदा मला समजावून घ्यावेच लागेल. थोडा खडखडाट तेव्हाही होईलच.
पण कोलमडून पडावे असे काही नसेल. विशेषतः ! अवेळीच शेखर निघून गेला तसे. त्या प्रकारातले तर नाहीच.
"शेखर अवेळीच गेला खेळ सोडून!" ती उसासली आत्ताही. हे तर आपल्याला नेहमीच जाणवणार वळणांवर, वेगवेगळ्या वेळी. हेही सत्य तिला पटकना लागणार होते. स्वतःसाठी पण ती आता स्थिर होती. आतूनच... स्वतःसाठी. मनात लाटांची कसल्याच प्रकारची खळबळ ही नव्हतीच ! ह्या वळणावर. एवढे खरे.

