Navinya Prakashan
Bahirji Naik by Dr Raj Jadhav
Bahirji Naik by Dr Raj Jadhav
Couldn't load pickup availability
योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हा शिवरायांनी माझ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मी हयातभर कधीच मोडला नाही आणि आज हयात नसताना देखील तो मी मोडणार नाही. माझ्या राजांचा आदेश मानूनच मी बोलणार आहे; सर्व काही सांगणार आहे. स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे, असा मी कोणी महानायक किंवा युगपुरुष नाही. इतिहास कथन करू शकेल असा इतिहासकार तर मुळीच नाही; परंतु इतिहासाचे आणि जवळपास सर्वच दोस्त-दुश्मनांचे भेद जाणणारा आणि इतिहासाच्या पानांना माहीत नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीच आहे. इतिहासाने या बहिर्जीची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणारही नाही. कारण इतिहास कधीच गुप्तहेराचा साक्षीदार नसतो; परंतु हा गुप्तहेर बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे.

