Navinya Prakashan
Barach Kahi Manatala by Girija Keer
Barach Kahi Manatala by Girija Keer
Couldn't load pickup availability
बरंच काही मनात...
गिरिजा कीर
आदूर दोन करवंदी डोळे लुकलुकले, कपाळावरची सोनेरी महिरप घोडो मोहक दिसली. फुत्सफुलांच्या रंगीत पंख्यानं गिरकी घेतली. तो घेर सांभाळत एक कौतुक समोर आलं. गुलाबी गालांतून डोकं वर काढणारं अपरं नाक, पापण्यांच्या दाट सावलीतून भिरभिरणारे डोळे, "आम्हाला बाई हसून येत मागणारे केशरी विलग ओठ.... ओह । सुंदर दिसावं तर असं। गोड हसावं तर असं!"
"अबो, दिल्लीला त्ये मोदी म्हून सरकार हैत म्हनं? त्ये गरिबाचं भलं करत्यात म्हनं. त्येस्नी कळीवलं, तर आपल्या भिती लिपून. छत दुरूस्त करूनश्यान घेतील नव्हां?"
"अग माझ्या बेदाणे, तू किती म्हून अक्कलवान असचील?"
"आत्ता! माज्या अकलेचं काय?"
"अग, सरकार म्हंजी एक माणूस वाटला व्हय तुला? आन ते मोली म्हंजी कोन वाटलं ग? त्ये शिडीवर चढूनश्यान तुजं गळकं छप्पार लिपून देतील व्हय? अगं वेडाबाई, ते सुतार हैत का गवंडी ? त्ये भारताचं राजंब हैत म्हन की! तुज्या डोस्क्यात काय फकस्त कांदें-बटाटं भरल्यात काय?"
आणि असे खुमासदार संवाद फक्त गिरिजा कीर
यांची लेखणीच देऊ शकते
'बरंच काही मनातलं...' मधून

