Navinya Prakashan
Bhairav Puran by Dr Shashank Duttatray Kulkarni
Bhairav Puran by Dr Shashank Duttatray Kulkarni
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
एक संध्याकाळ
' थांबत नाहीस.'
' अंहं. ज्याला कुठं थांबायचं ते कळलं नाही त्याचं आयुष्य हे
विस्कळीतपणे वहातच रहातं. जानेदो!'
दूरवरून येणारा पोलीस जीपचा सायरन कानावर आला तसा मी भानावर आलो. दोन्ही हातानी चेहरा चोळत इकडं तिकडं पाहिलं अन् परिस्थितीचं भान आलं.
मधुरा गेली.
किशोरीही गेली.
मागे मी राहिलो होतो. एक शापित जीवन जगण्यासाठी. मधुराच्या अंत्यविधीला गेलो नव्हतो. पण किशोरीच्या अंत्यविधीला जाणं भाग होतं. मागची चूक थोडी तरी सुधारणार होती.
लडखडत्या पायानं मी उभा राहिलो.
नेहमीचीच संध्याकाळ पण ती आज अधिक उदास झाली होती

