Navinya Prakashan
Bhatkanti Prachin Leni Va Mandiranchi by Sushil Dudhane
Bhatkanti Prachin Leni Va Mandiranchi by Sushil Dudhane
Couldn't load pickup availability
घाटवाटांवर दोन पुस्तके व गडभटकंतीवर एक पुस्तक लिहिल्यावर मी अनोखी भटकंती करायचे ठरविले. या भटकंतीत प्राचीन लेणी, प्राचीन मंदिरे, वाडे, अपरिचित व दुर्लक्षित भुयारे व डोंगर या सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन याची अभ्यासपूर्ण माहिती वाचकांपर्यंत, भटक्या मंडळींपर्यंत एका सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून पुस्तक स्वरूपात आपणा समोर घेऊन आणण्याचा संकल्प केला.
या भटकंती मधूनच 'भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची' हा पुस्तकरूपी खजिना आपल्या संग्रही विराजमान होण्यास घेऊन आलो आहे.
या पुस्तकात अपरिचित मंदिरे, लेणी, प्राचीन भुयारे यांची एक सुगम वाटाड्याच्या भूमिकेतून माहिती दिली आहे.
लेणी म्हणजे नक्की काय? लेणी ही संज्ञा कधी अस्तित्वात आली? लेणी कोणत्या शतकात उदयास आली?
मंदिरे याचा अर्थ काय? मंदिरे कोणत्या काळातील आहेत? मंदिरातीत आतील व बाहेरील भागातील ठिकाणांना काय म्हणतात? मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर ओट्यावर का बसावे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

