Navinya Prakashan
Bill Gates Sanganak Pranalicha Raja by Dr Anant P Labhsetwar
Bill Gates Sanganak Pranalicha Raja by Dr Anant P Labhsetwar
Couldn't load pickup availability
आज संपूर्ण जगात सुमारे चारशे दशलक्षाहून अधिक संख्येने संगणक वापरले जातात. त्यातले एकशे पंचवीस दशलक्ष इतके संगणक केवळ भारतात वापरले जातात. संगणक सुरू केल्यानंतर सर्वप्रथम मायक्रोसॉफ्ट कंपनीचं बोधचिन्ह संगणक पटलावर आपल्याला दिसतं. त्यानंतर त्या कंपनीन निर्माण केलेल्या कार्यप्रणालीवर संगणक काम करतो त्या यशस्वी कार्यप्रणालीचा सहसंस्थापक आणि अर्ध्वयू बिल गेट्स आहे हे संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच माहित आहे.
बिल गेट्स गेली काही वर्षं सातत्याने जगातली श्रीमंत व्यक्ती म्हणून गणली गेली आहे. त्यांनी तासाला एक दशलक्ष डॉलर खर्च केले तरी ते संपण्यासाठी शंभर वर्षे जावी लागतील. धनाने श्रीमंत असणारी ही व्यक्ती मनानेदेखील तितकीच श्रीमंत आहे.
यशाचे शिखर गाठताना मायक्रोसॉफ्ट कंपनीला व त्याच्या अर्ध्वयूंना न सुटणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. मात्र बिल गेट्स यांच्याजवळ असणाऱ्या असामान्य दूरदर्शीपणामुळे आणि अथक कष्टामुळे संपूर्ण जगात ह्या कंपनीला अव्वल स्थान मिळाले. त्या कष्टामागचा बोलका इतिहास म्हणजेच सदर पुस्तक आहे.

