Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Cancer Grasta Tarihi Swastha by Maya Dharmadhikari

Cancer Grasta Tarihi Swastha by Maya Dharmadhikari

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

"गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने रागलोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात !!!"

माया धर्माधिकारी

गेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न !

कॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.

मंगला गोडबोले

View full details