Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Dalimbi Rangacha Khada Ani Itar Katha by Dr Prakash Ganesh Karmarkar

Dalimbi Rangacha Khada Ani Itar Katha by Dr Prakash Ganesh Karmarkar

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

मानवी जीवनातील अनेक घटना अगम्य असतात. काही माणसं आपल्याला सर्व काही कळतं, आपण करतो ते बरोबरच समजून चालतात; पण नियती आपला खेळ खेळत असते. ती माणसाला केव्हा चकवा देते, ते कळतच नाही आणि कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. माणसाच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. काही भोळी-भाबडी, काही बनेल, काही कलंदर वृत्तीची, काही कलासक्त तर ध्येयानं पछाडलेली, काही रांगडी, काही स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी आणि अन्याय सहन करणारी ही स्वभाववैशिष्ट्ये असणारी माणसं सतत आपल्या आवतीभोवती फिरत असतात. कथांची ती बिजं असतात. कथारूपानं जेव्हा त्या बिजाचा अंकुर वाचकांपुढे येतो, तेव्हा त्याच्या मनात भावविश्व निर्माण व्हायला वेळ लागत नाही आणि केव्हा त्या अंकुराचा वटवृक्ष झाला ते कळतही नाही. कुमार वाचकांसाठी अशा कथा म्हणजे भविष्याची शिदोरीच असते. कथा वाचता वाचता वाचक त्यात समरसून जातो, संस्कारक्षम होतो, हेच त्या कथांचं यश असतं.

View full details