Navinya Prakashan
Dr Shyamaprasad Mukherji by Dr Girish Dabke
Dr Shyamaprasad Mukherji by Dr Girish Dabke
Couldn't load pickup availability
गिरीश दाबके
वयाच्या केवळ चौतिसाव्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचा कुलपती झालेला गाढा विद्वान. मातृभाषेतूनच शिक्षण असावे हे सांगणारा आणि कुलपती म्हणून ते धोरण अमलात आणणारा द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ. बंगाली, हिंदी आणि उर्दू भाषांच्या विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करणारा शिक्षणमहर्षी.
हिंदूमहासभेचे नेतृत्व सावरकरांच्याच धडाडीने आणि कौशल्याने करणारा धुरंधर नेता.
स्वतंत्र भारताला औद्योगिक प्रगतीची दिशा देणारा द्रष्टा प्रशासक.
स्वतंत्र भारताचा पहिला उद्योग मंत्री.
हिंदूंच्या भीषण कत्तली झाल्या म्हणून केंद्रीय मंत्रीपद सोडणारा निस्पृह आणि निर्भय राजकीय नेता.
'काँग्रेसला एक वेगळा राष्ट्रीय पर्याय मी उभा करीन' अशी प्रतिज्ञा करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी 'भारतीय जनसंघा'ची स्थापना करणारा कालजयी राजपुरूष !
मा. अटलजी बलराज मधोक, दीन दयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, लालकृष्ण अडवाणी अशा दिग्गज नेत्यांना घडविणारा श्रेष्ठ राजगुरू.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी.

