Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Gajlelya Jagatik Rajakiya Hatya by Dhananjay Raje

Gajlelya Jagatik Rajakiya Hatya by Dhananjay Raje

Regular price Rs. 600.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 600.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

'गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या' हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैकी म. गांधी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वोच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्यांमागचे कटकारस्थान, घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवेल. जग जसजसे आधुनिकतकडे जात गेले तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यांमध्येही बदल होत गेले. म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर इथपासून ते मानवी बाँबपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो.

ज्येष्ठ संपादक, पत्रकार श्री. कुमार केतकर लिहितात- हे पुस्तक केवळ सुजाण वाचकांसाठी मर्यादित नाही, केवळ करमणुकीसाठी नाही तर हे अभ्यासाचे पुस्तक आहे. विविध परीक्षांना (यूपीएससी इत्यादी) ते अगदी केबीसी (कौन बनेगा करोडपती) साठी तयारी करणाऱ्यांनाही हे उपयोगी पडेल. राजकीय हत्या या राजकारणाचा, सत्तेचा समतोल बदलण्यासाठी केल्या जातात. त्या घडत नाहीत, घडविल्या जातात. राजे यांच्या या पुस्तकाबद्दल इतकेच म्हणता येईल की, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे आणि तो एखाद्या रहस्यकथेसारखा सादर केला आहे.

View full details