Navinya Prakashan
Ghat Wata by Sushil Dudhane
Ghat Wata by Sushil Dudhane
Couldn't load pickup availability
सह्याद्रीतील ट्रेकिंगचा सुगम वाटाड्या
गेली दहा-पंधरा वर्ष सह्याद्रीतील वाटांवर सातत्याने पण सहज भटकंती करणारे सुशिल दुधाणे यांचे हे पुस्तक एक सुगम वाटाड्या म्हणुन ट्रेकरला उपयुक्त आहे.
पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील आनंददायी सफरी चे वर्णन या पुस्तकात आले आहे. काही उपयुक्त सूचना आणि अनुभवातून आलेले शहाणपण यामुळे सुशिल राव यांचे या विषयावरील प्रेम दिसून येते. ही प्रेमाची शिदोरी घेऊन पडा घराबाहेर, पण डोळे उघडे ठेवून, असा हा सुगम वाटाड्या सर्वांना सांगतोय.
आनंद पाळंदे
गिर्यारोहनात सतत कार्यरत असलेल्या या शिलेदाराणे स्वतः घाटवाटां बाबतचा अनुभव घेऊन व त्या बाबतच्या बारीक सारीक नोंदी लिहून सुशिल दुधाणे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. सह्याद्रीत घाटवाटांचे स्थान इतकं महत्त्वाचे आहे की घाटवाटांशिवाय सह्याद्रीचा विचार म्हणजे देवाशिवाय देयालयाचा विचार करण्यासारखे आहे. घाटवाटा ह्या भटकंतीच्या केंद्रबिंदू आहेत, सह्याद्रीतील घाटवाटांचे महत्व लक्षात घेऊन पुस्तकात नेटकी मांडणी करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात माहिती देताना विविध वाटा, त्यावरील खाणाखुणा, वाटेतील अडचणी, वाट चुकण्याची शक्यता ह्या सर्व गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ या नियतकालिकांनीही त्याचे अनुभव वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत. गिर्यारोहकांना व डोंगरात भटकणाऱ्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

