Navinya Prakashan
Goshta Yashaswi Abhimanyuchi by Onkar Vartale
Goshta Yashaswi Abhimanyuchi by Onkar Vartale
Couldn't load pickup availability
गोष्ट हा तसा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग. प्रत्येकाला गोष्ट ऐकायला आवडतेच. प्रत्येकाकडे स्वतःची अशी गोष्ट असतेच. काही गोष्टी सांगितल्या जातात, तर काही गोष्टी न सांगताच खूप काही शिकवून जातात. काही गोष्टी या शोधाव्या लागतात. हे पुस्तक अशाच एका यशस्वी अभिमन्यूची गोष्ट सांगते. खडतर शिक्षणाची वाट पदरी पडलेल्या आणि त्यातून ध्येय व उद्दिष्ट गाठणाऱ्या नितीन कुल या विद्यार्थ्यांची ही गोष्ट आहे. एका मुलाने मनोमन ठरवलेल्या उद्देशाशी आणि ध्येयाशी प्रामाणिक राहून केलेला हा प्रवास, म्हणजे शिक्षणाचा संवेदनशील आविष्कार आहे. एक मुलगा शून्यातून विश्व कसे उभारतो आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या संघर्षमय परिस्थितीचे चक्रव्यूह भेदून कसा यशस्वीपणे बाहेर पडतो, ही गोष्ट प्रत्येक तरुणाने आणि शालेय वयाच्या मुलांनी वाचावी अशीच आहे.

