Navinya Prakashan
Gudh Antarik Shakti Arthat Manasvidnyan by Jyotishacharya Dr Narendra Dharne
Gudh Antarik Shakti Arthat Manasvidnyan by Jyotishacharya Dr Narendra Dharne
Couldn't load pickup availability
मन एवं मनुष्यानं कारणं बंधमोक्षयो... मन हेच. लौकिक अर्थाने सुख आणि दुःखाचे मूळ कारण आहे. ते सुखी कसे होईल, याचाच मार्ग या पुस्तकात आहे. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीस काळजी, चिंता, विचार, भीती काहींना काही विषयांबद्दल असते. त्यामुळे मन दुबळे आणि शक्तिहीन होते. आपले मन प्रसन्न आणि आनंदी ठेवून बलवान कसे करावे, लोकांवरती छाप पाडून आपले कार्य कसे करून घ्यावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायीक या सर्वांनाच हे पुस्तक फारच उपयोगी आहे. मनाची आंतरिक शक्ती कशी वापरावी आणि आपले कार्य कसे करून घ्यावे याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोर्स या पुस्तकात आहे. मनःशक्ती, टेलीपथी, यशाची सूत्रे, संमोहन यांचा कसा वापर करावा जीवनासाठी हेपण सांगितले आहे. प्रत्येक मनुष्याची मनाची शक्ती ही वेगवेगळी असते. त्यामुळे येणारे अनुभवसुद्धा कमीअधिक वेळेत येतात. पुस्तकात असणारा कोर्सचा हा अनुभव व्यक्तीनिहाय वेगवेगळा असू शकेल हेपण सत्य आहे.
सर्वत्र सुखिनः सन्तु... सगळे सुखी आणि आनंदी व्हावे हाच मूळ उद्देश या पुस्तकाचा आहे. पुस्तकातील कोर्स करताना काही शंका-प्रश्न-अडचणी आल्यास मला जरूर संपर्क करावा. म्हणजे त्यादूर करता येतील.
डॉ. नरेंद्र धारणे
ज्योतिषविद्या वाचस्पती / पी. एच. डी. / लेखक B.E. (Production) MBA भ्रमणध्वनी : ९८९००४६२७३

