Navinya Prakashan
Hak Chandolichi by Dhondiram Mullick
Hak Chandolichi by Dhondiram Mullick
Couldn't load pickup availability
"नित्य नुतन हिंडावे । उदंड देशाटन करावे !
डीराम मुळीक
श्री समर्थ रामदास स्वामींच्या या संदेशाची अनुभूती घ्यायची असेल तर लोकांनी नेहमी नवनवीन ठिकाणी हिंडावे, मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रदेशांत भटकावे. दुर्लक्षित अशा पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्यावी. सदर पुस्तक हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक, पौराणिक व भौगोलिकदृष्ट्या महत्ता असलेल्या, पण पर्यटनदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या शिराळा तालुक्या प्रकाशित केले असून, तालुक्यात कुठे आणि काय पाहण्यासारखे आहे या तपशीलवार माहिती व मार्गदर्शक नकाशे या पुस्तकात दिले आहेत. याच उपयोग हौशी व अभ्यासू पर्यटक, विद्यार्थी यांना निश्चितपणे होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना शेतीबरोबर इतर रोजगार मिळावेत व त्यांची प्रगती व्हावी हीच आंतरिक इच्छा. 'भटकंती शिराळा तालुक्याची, हाक चांदोलीची... या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तरी हे पुस्तक सर्वांना आवडेल अशी आशा व्यक्त करतो.
चला तर मग शिराळा तालुक्याच्या भटकंतीला चांदोली आपणास हाक मारत आहे.

