Navinya Prakashan
Hati Hota Shunya Tarihi by Omkar Mahadev Vartale
Hati Hota Shunya Tarihi by Omkar Mahadev Vartale
Couldn't load pickup availability
माझ्या वडिलांचे आत्मवृत्त
वडील घराबाहेर अनेक संकटांशी झुंजत असतात, परिस्थितीशी दोन हात करत असतात, राबत असतात, नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात... कां ? तर घर व्यवस्थित चालावं म्हणून. कुटुंब टिकावे म्हणून.
वडिलांच्या संघर्षाला कसलंही मोजमाप नसतं. अगदी दारिद्याच्या विळख्यातून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठीसुद्धा त्यांच्या संघर्षाची मदत होत असते आणि ती सुद्धा एक यशस्वी कहाणी होऊन लोकांपुढे येत असते. एखाद्या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाने अज्ञानाकडून ज्ञानाकडे किंवा निरक्षरतेकडून साक्षरतेकडे प्रवास केला तरी ती कुटुंबाच्या भाव-विश्वातली खूप मोठी गोष्ट असते.
हा एवढा बदल झाला तरी त्या कुटुंबाच्या कर्त्या म्हणजेच वडिलांची एक यशस्वी संघर्षकथा बनते.
वडिलांचा संघर्ष ज्या भुलाने पाहिला तो मुलगा खरंतर भाग्यवानच म्हणायला पाहिजे. मी त्यापैकी एक.
माझ्या वडिलांच्या आत्मवृत्तस्वरूपी शब्दांचा भारवाहक बनून अशीच एक संघर्ष कहाणी या पुस्तकात मांडली आहे.

