Navinya Prakashan
Himachal - Spiti, Pin, Sangla by Onkar Vartale
Himachal - Spiti, Pin, Sangla by Onkar Vartale
Couldn't load pickup availability
'जगाच्या आतील एक वेगळे जग' व 'जिथे स्वतः देव नांदतो' असं म्हणत ज्या ठिकाणाची तारीफ केली जाते ते ठिकाण म्हणजे हिमाचलची "स्पिती व्हॅली" ! हिमाचल प्रदेशच्या उत्तरपूर्वीय भागात म्हणजेच भारत आणि तिबेट सीमेजवळ जी कोल्ड डेझर्ट माउन्टन व्हॅली पसरलेली आहे तीच ही स्पिती व्हॅली. याव्यतिरिक्त सांगला आणि पिन या नद्यांच्या खोऱ्यातही हिमालयाची सुंदर आणि रौद्र रूपे एकाच वेळी अनुभवयास मिळतात. निसर्गाशी साधर्म्य साधत बांधलेल्या वेगवेगळ्या पर्यावरण स्नेही स्तुपांमधून, गोम्पांमधून साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणा आपल्याला ठायी ठायी दिसतात. ही आहेत अतिशय दुर्गम पर्यटन स्थळे ! आपल्या अफलातून सौंदर्यामुळे आता अधिकाधिक पर्यटकांना आकषून घेत आहेत. केवळ भटकेच नव्हेत तर बायकर्सना, फोटोग्राफर्सना आणि सोलो ट्रेकर्सनाही इथली भुरळ पडते आहे! अशा स्पिती-पिन-सांगला या तीन खोऱ्यातली ही भटकंती.

