Navinya Prakashan
Kadhi Bahar Kadhi Shishir by Mangala Godbole
Kadhi Bahar Kadhi Shishir by Mangala Godbole
Couldn't load pickup availability
'फुल टू धमाल' म्हणजे काय ? 'रेडिओ मिरची' हे काय प्रकरण आहे ? टी-व्ही 'कोथिंबीर' का नसावी ? 'मी तुझी मदत करतो, तू माझी कर,' हे काय आहे ? मदत 'माझी' करतात का मला करतात ? नारळ खवणणे म्हणजे काय? रताळ्याचा खीस कुठला? आलं-लसणाची पेस्ट कशी बनते? त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्या, म्हणजे नक्की काय समजून घ्यायचं ? 'मानसिकता' हे काय लफडं आहे ? आधीच मन, पुढे मानस, पुढे 'इक' प्रत्यय लागून मानसिक, पुढे निष्कारण मानसिकता, आता त्याही पुढे 'मानसिकताई' म्हणायला लागायचं का? सूतकताईसारखं ? पोरांना शाळेत घालतात की टाकतात ? 'जेवण बनवलं का?' हा काय प्रश्न आहे ? 'स्वयंपाक केला का ?' असं म्हणता येणार नाही का ? साडी घालतात का ? स्वेटर शिवतात का ? झाडू लावतात का ? जेवण लावलंय म्हणजे 'खाना लगाया है' असंच ना ? पुढ जाऊन ते वक्ते म्हणाले... ही काय कृती आहे ? कशाच्या पुढे जाऊन ? फार पुढे गेले तर स्टेजवरून पडतील ना बिचारे... 'आगे चलके उन्होने कहा' असं हिंदीत असतं, म्हणून आपणही पुढे जाऊन बोलायचं ? बघावं तो कार्यक्रम बेटा 'संपन्न' कसा होतो ? आणि त्या ठिकाणी एखादी मरतुकडी समई शंभरदा काड्या ओढत, कशीबशी लावली की झालं दीपप्रज्वलन. ही मायमराठी की माय मराठी ?
जीवनात पदोपदी येणाऱ्या अशा अनेक गमतीदार; पण भेदक क्षणांचं थेट चित्रण तुम्हाला (कदाचित) अंतर्मुख करून विचार करायला लावेल, तरच सौ. मंगला गोडबोले यांच्या या पुस्तकाचा प्रपंच सार्थ होईल
