Navinya Prakashan
Kashtakaryanchya Kavita by Damodar Andhare
Kashtakaryanchya Kavita by Damodar Andhare
Regular price
Rs. 115.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 115.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
विषयाचा आंदणा दिसे केविलवाणा। करीतसे कल्पना नानाविध ॥१॥
कुटुंब पाईक म्हणवी हरिचा दास। मागे ग्रासोग्रास दारोदारी ॥२॥
जळो त्याचें कर्म जळो त्याचा धर्म । जळो आश्रम तो जाणीवेचा ॥३॥
कल्पद्रुमातळी काखे घेऊनि झोळी। बैसोनि सांभाळी भिक्षा अन्न ॥४॥
अधम पोटभरी विचार तो न करी। पुढती दारोदारी हिंडो जाय ॥५॥
पोटालागी करी नाना विटंबना । संतोषवी मना दुर्जनांच्या ॥६॥
न करी हरीचें ध्यान वैसोनि एकांती। जन्माची विश्रांति जेणें होय ॥७॥
द्रव्याच्या अभिलाषं जागे सटवीपाशीं। नवजे एकादशी जागरणा ॥८॥
उत्तम मध्यम अधम न विचारी। स्तुति नाना करी आशाबद्ध ॥९॥
वैराग्याची वार्ता कैंची दैवहता। नुपजे सर्वथा प्रेमभाव॥१०॥
नामा म्हणे ऐसें तारी एक्या गुणें। अजा आरोहण गजस्कंधी ॥११॥

