Navinya Prakashan
Katha Dharmik Prathanchya by Prof Devba Shivaji Patil
Katha Dharmik Prathanchya by Prof Devba Shivaji Patil
Couldn't load pickup availability
आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये मनावर चांगले संस्कार करणाऱ्या प्रथांच्या गोष्टींचा मौल्यवान खजिना आहे. त्यातून कळत नकळत मुलांवर चांगले संस्कार होत असतात. मुलांवर बालपणापासूनच उत्तम नीतिमूल्यांचे संस्कार केले, तर त्यांच्या भावी जीवनाचा पाया बालपणापासूनच मजबूत होतो की, ज्यावर त्यांच्या आयुष्याची इमारत पक्की उभी राहते.
'कथा धार्मिक प्रथांच्या' ह्या बालकथासंग्रहाद्वारे देवपूजा का करतात, दिवा का लावतात, आधी गणपतीची पूजा का करतात, स्तोत्रे-श्लोक वा मंत्र का म्हणतात, उपवास का करतात, नैवैद्य प्रसाद म्हणजे काय असते, प्रत्येक स्तोत्र व मंत्राची सुरुवात ओमनेच का होते, पूजेत रांगोळी-स्वस्तिक-कलश ह्यांचे काय महत्त्व आहे, होमहवन का करतात, आरती का करतात अशा आपल्या काही धार्मिक प्रथांची संस्कारशील उच्चतम तत्त्वे आणि त्यांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मंदिराचा कळस उंच व गाभाऱ्याचा दरवाजा ठेंगणा का असतो, गाभाऱ्याचे छत गोल घुमटाकारच का असते, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवतात, विठ्ठलाच्या मंदिरात कासव व महादेवाच्या मंदिरात नंदी का असतो, हनुमानाचे तोंड दक्षिणेलाच का असते, सूर्याला अर्घ्य का देतात, दारी तुळस का लावतात अशा गोष्टींचीही माहिती रसाळ व सोप्या भाषेत ह्या पुस्तकात दिली आहे. शास्त्र व विज्ञान यांची उत्कृष्ट सांगड घातली आहे.
हे पुस्तक आपल्या धार्मिक प्रथांविषयीची शास्त्रीय दृष्टिकोनातून उचित माहिती देत असल्याने आजच्या काळातील सर्वच कुमार-कुमारिकांना, ज्ञानपिपासू शिक्षकांना व जिज्ञासू पालकांनासुद्धा ते अतिशय उपयोगी आहे.

