Navinya Prakashan
Kon Tu by Suresh Deshpande
Kon Tu by Suresh Deshpande
Couldn't load pickup availability
मराठी साहित्यात गूढकथांचे एक वेगळेच स्थान आहे. गूढकथा विपुल प्रमाणात नसल्या तरी त्यांचाही एक विशिष्ट असा वाचकवर्ग आहे. गूढकथा लिहिणारे लेखकही संख्येने कमीच आहेत आणि त्यातही प्रत्येक लेखकाची शैली आणि बाज वेगळा आहे. द. पां. खांबेटे, नारायण धारप, बशीर मुजावर, र. अ. नेलेकर आणि रत्नाकर मतकरी ही काही सहज आठवणारी नावे. धारप यांच्या कथा वेगळ्या धाटणीच्या तर मतकरींच्या आणखीनच निराळ्या ! कथेतील वातावरण गूढ असले किंवा नसले तरी प्रत्येक गूढकथेचा शेवट हा अत्यंत अकल्पित असा, काहीसा धक्का देणारा असतो. वाचक कथा वाचत असताना त्याच्या मनात कथेच्या शेवट काय असू शकेल याची एक कल्पना तयार होत असते आणि अचानक त्या कल्पनेला धक्का देणारा शेवट होतो...!
प्रस्तुतच्या कथासंग्रहातील कथा या अत्यंत प्रवाही, वाचकाची उत्सुकता क्षणोक्षणी वाढवत जाणारी लेखनशैली, आता काय होणार असे वाटत असतानाच अकल्पितपणे वाचकाला विलक्षण अनुभव देणाऱ्या अशा कथा आहेत.

