Navinya Prakashan
Krantiveer Sawarkar by Mihir Kulkarni
Krantiveer Sawarkar by Mihir Kulkarni
Couldn't load pickup availability
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका अनन्यसाधारण होती. त्यांनी छत्रपती शिवरायांना आराध्यदैवत मानून ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र प्रतिकार केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. सरदार भगतसिंग, सर मानवेंद्रनाथ रॉय, रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या कित्येक क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते. जॅक्सनवधानंतर अनेक तरुणांची नाहक छळवणूक बघून पकडले जाण्याचा धोका असूनही ते पॅरिसहून लंडनला आले. राष्ट्राच्या सीमा सूतकताईने नव्हे, तर तलवारीच्या टोकाने निश्चित केल्या जातात, ही त्यांची भूमिका आजही लागू पडते. सावरकरांचे विचार मार्गदर्शन हे स्वातंत्र्यपूर्व वा स्वातंत्र्योत्तर काळापुरतेच नव्हते. आजच्या काळात आणि पुढे भविष्यातदेखील ते उपयोगी पडेल.

