Navinya Prakashan
Leh Ladakh - Ek Adbhut Prawas by Onkar Vartale
Leh Ladakh - Ek Adbhut Prawas by Onkar Vartale
Couldn't load pickup availability
लडाखचा परिसर हामीमा राखी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. देशाचा मुकुटमणी मधल्या "लडाख या ठिकाणाला भारताच्या पर्यटनाचा मानबिंदाजे सवार उतार मध्या या हिऱ्याबद्दल बोलताना, लिहिताना प्रवासप्रेमींना विशेषणे कमी पलू येथील अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने भान हरपून जाते. दर्दी भटक्यांना कम हवाहवासा वाटणारा हा दुर्गम आणि थंड हवेचा प्रदेश अक्षरशः वेड लावून जातो. त्यामुळेच हे ठिकाण नुसते बघायचे नाही तर ते बाईकवर किंवा स्वतः गाडी चालवत नेऊन पाहायचे हे मी मनोमन ठरवले होतेच.
हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, मध्येच सखल भूमीत दिसणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, तलावांचे पारदर्शी निळे पाणी, खोल दऱ्या, रोमांचकारी अनुभव देणारे रस्ते, असा नजारा पाहताना एका वेगळ्याच विश्वात जायला होते. या भूमीवर एक विलक्षण शांतीचा अनुभव येतो. बौध्द धर्माच्या पगड्यामुळे या प्रदेशाला अध्यात्मिक पार्श्वभूमीही आहे. आयुष्यात एकदा तरी या भागात फिरायला का आले पाहीजे याचे उत्तर तुम्हाला इथला निसर्गच देतो.

