Navinya Prakashan
Loknyay Va Nyayvachane by Dr Sou Sushama D Abhyankar
Loknyay Va Nyayvachane by Dr Sou Sushama D Abhyankar
Couldn't load pickup availability
लोकन्याय म्हणजे अनुभवांचे कथन व क्वचित उपदेश करणारे छोटेखानी वाक्य. ह्या न्यायांमुळे संस्कृत भाषेला एक सौष्ठव प्राप्त झाले आहे. श्रोत्याला किंवा वाचकाला एखादा उपदेश करणे किंवा एखाद्या गोष्टीचे ज्ञान करून देणे हे न्यायाच्या द्वारा चटकन करता येते.
गुरु ज्याप्रमाणे शिष्याला मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे न्यायही मनुष्याला मार्गदर्शन करतात. कोणाच्यातरी बाबत घडलेला प्रसंग त्याद्वारे झालेला दृष्टान्त म्हणजे न्याय. दृष्टान्त म्हणजे साक्षात्कार. हा साक्षात्कार न्यायाच्या द्वारा बोध किंवा शिकवणिच्या रुपात वाचकाला मिळतो आणि तो आपल्या जीवनशैलीशी जुळणारा असल्याने वाचक ते अंगिकारण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते. हा बोध व शिकवण न्यायांद्वारे व न्यायवचनांद्वारे उलगडून सांगणे हाच या पुस्तकाचा खरा हेतु .
तसेच न्यायाच्या अनुषंगाने ज्या कक्षा येतात त्यांच्या द्वारेही मनुष्याचे मनोरंजन तर होतेच पण त्यातून बोध व
शिकवण पण मिळते.

