Navinya Prakashan
Mahapurush Mandela by Joseph Tuscano
Mahapurush Mandela by Joseph Tuscano
Couldn't load pickup availability
स्वर्गीय नेल्सन रोलिहलाल्ला मंडेला हे दक्षिण आफ्रिका देशाचे पितामह (ताता) होते, जसे मोहनदास करमचंद गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता होते. आपण सारे त्यांना 'बापू' म्हणायचो. तसेच त्यांना 'मदिबा' म्हणून पुकारत. त्यांचे सारे आयुष्य वर्णद्वेषाविरुध्द लढत लढत तुरुंगात गेले. पण जीवनाच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आपले साखळदंड अहिंसक मार्गाने तोडले व ते मुक्त झाले. केवळ हातापायांना जखडणे, साखळदंड तोडणे म्हणजे मुक्ती नव्हे, तर इतरांच्या स्वातंत्र्याची कदर नि आदर करणे म्हणजे खरी मुक्ती होय, असे ते मानीत. मानवतेच्या स्वातंत्र्यासाठी जीवात जीव असेपर्यंत लढायचे हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. त्यांचे निस्वाःर्थी नेतृत्व, आपल्या देशबांधवांप्रती असलेली अनुकंपा आणि त्यांची उदात्त परंपरा यांसाठी ते देशवासियांच्याच नव्हे तर अखिल जगाच्या स्मरणात राहतील. भावी पिढीसाठी त्यांचे त्यागपूर्ण जीवन एक आदर्श आहे.

