Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Majhi Sansaryatra by Govind Sakharam Sardesai

Majhi Sansaryatra by Govind Sakharam Sardesai

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 340.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

आत्मचरित्राने प्रसिद्धी मिळवण्याइतके माझे चरित्र महत्वाचे नाही, हे मी जाणून आहे, आणि राष्ट्राच्या बौद्धिक संपत्तीत भर घालण्याइतकी माझी ऐपतही नाही. तेव्हा आत्मचरित्र लिहण्याच्या किंवा प्रसिद्ध करण्याच्या भरीस पडणे अनुचित होय असे मी मानतो.

मनुष्याची एकंदर प्रगती पूर्वानुभवावर आधारलेली असते. म्हणून माझ्या जीवनात राष्ट्रपयोगी अंश विशेष नसला तरी प्रत्यक्ष माझे कोटुंबिक, आप्तइष्ट किंवा व्यवहारसंबद्ध व्यक्ती अशांचा वर्गही बराच मोठा असून त्याचा परिणाम माझ्या जीवनावर पुष्कळ झालेला आहे. माझ्या पश्चात 'रियासतकार' एवढेच नाव माहीत असणार म्हणून माझे सर्व अवांतर अनुभव एकत्र लेखबद्ध झालेले जिज्ञासुंना कळणे इष्ट होय असे विचार मनात वारंवार घोळत असतात.

आत्मचरित्र लिहण्याची पुष्कळदा एक प्रथाच पडलेली दिसते ती मला मान्य नाही. आपणांस काही विशिष्ट सांगण्यासारखे नसेल तर आत्मचरित्र लिहण्याच्या भरीस माणसाने पडू नये. बहुमोल टिकाऊ आख्यान मला सांगता आले नाही तरी जे अनुभव किंवा आठवणी थोड्याबहुत उपयुक्त वाटतात

तेवढ्याचाच संग्रह मी यात केला आहे"

View full details