Navinya Prakashan
Mavaltiche Rang by Sanjay Gokhale
Mavaltiche Rang by Sanjay Gokhale
Couldn't load pickup availability
अशाच एका वर्षी ऑक्टोबर महिन्यात पर्यटकांचा एक मोठा गट तिथे आला. त्यातील एक जण पूर्वी तिथे येऊन गेला होता व त्याने तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला होता. साहजिकच बाकीचे लोक त्याला 'त्या' वर्षीच्या फॉल कलर्सबद्दल खोदून खोदून विचारत होते व तोही मोठ्या उत्साहाने सर्व हकीकत अगदी मनापासून रंगवून रंगवून सांगत होता. 'असे फॉल कलर्स जगात कोठेही आजतागायत कोणी पाहिले नाहीत', हे त्याचे विधान ऐकणाऱ्या सर्वांनीच सहजपणे मान्य केले. त्याचे ते बोलणे बाजूलाच असलेल्या 'त्या' झाडाच्या खोडातील आजोबांनी ऐकले व एक सुस्कारा सोडत ते स्वत. शीच म्हणाले, "ते निव्वळ फॉल कलर्स नव्हते रे बाबांनो. असे म्हणून त्या रंगांचा अपमान करू नका.
सूर्य अस्ताला गेल्यावर, संध्येच्या कुशीतून पश्चिमेच्या क्षितिजावर प्रकटणारे, अतिशय विलोभनीय असे मावळतीचे रंग होते ते! केवळ एका पानाने आपल्या दोस्तांच्या मदतीने घडवून
आणलेला एक अद्भूत चमत्कार होता तो!"

