Navinya Prakashan
Me Ahe Na by Deepraj Mane
Me Ahe Na by Deepraj Mane
Couldn't load pickup availability
तसे पाहिले तर कोकणामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. त्यांची लय ही अगदी मनाला मोहून टाकणारी देखील आहे. परंतु असे असले तरी संगमेश्वरी बोली आणि तळ कोकणातील मालवणी भाषा याच फक्त अधिक सर्व दूर परिचयाच्या आहेत. लेखक दिपराज माने यांनी रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेला या कादंबरीमध्ये उजाळा दिला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भाषेची ओळख होते. शिवाय ग्रामीण भागातील समाजाचे जीवन नेमके कसे आहे? त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जात जगावे लागते? गाव, शेती, कुटुंब, सण, लोककला यांच्याशी जोडलेला माणूस या सर्व बाबींची नोंद घेतली आहे. त्यामुळे कादंबरी वाचताना आपले वर्णन केले आहे असे वाटते... आपले या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि आपणास आपल्या पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा!...
प्रा. सुर्यकांत माने
सहाय्यक प्राध्यापक, गोगटे जोगळेकर कॉलेज गरी

