Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Nakali Sinhachi Dhamal by Dr Sudarshan Dhas

Nakali Sinhachi Dhamal by Dr Sudarshan Dhas

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

देवी की पुरली तर आयुष्यभर ती फुलपाखरांचे पंख घेऊन बागडतात, पकली सिंहाची धमाल' हा असाच किशोरवयीन मुलांचे भावविश्व फुलवणारा नवाकोरा बालकथासंग्रह घेऊन डॉ. सुदर्शन धस विद्यार्थ्यांच्या भेटीला आले आहेत.

वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या या कथा मुलांची आयुष्यभर सोबत करतील, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडतील इतक्या मोहक झाल्या आहेत. जंगल सफर, स्वप्नरंजन घडवणाऱ्या या कथा कधी मानवी भावभावना लाभलेल्या पशुपक्ष्यांच्या अनोख्या दुनियेत घेऊन जातात. तर कधी या कथांमधून राहुल सारखा कनवाळू मुलगा, प्रामाणिक अमित, स्वच्छतादूत राजू, लेखन प्रेरणा लाभलेला मोहित, विचारशील अनिल, धाडसी मिलिंद, संस्कारी अरुण, परोपकारी रोहित, पाण्याचं मोल कळलेला राहुल, शिकण्यात रमलेली आनंदी, सण- संस्कृती जपणारा शाश्वतः प्रतिकूलतेतही छंद जोपासणारा श्रावण, आईच्या कष्टाचे मोल जाणणारा केतन आणि आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारा रोबोटिक नकली सिंह आपल्याला भेटतात.

आयुष्याचा पाया रचला जाण्याच्या कोवळ्या वयात बालवाचकांच्या हाती हा कथासंग्रह ठेऊन नैतिकता, माणुसकी, संस्कृती संवर्धन व पर्यावरण जागृती ही आदर्श जीवनमूल्ये रुजवण्याचा डॉ. धस यांचा प्रयत्न आहे. सशक्त आशय, उत्तम कथा बीजे यामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या कथा नक्की आवडतील असा विश्वास वाटतो.

View full details