Navinya Prakashan
Navin Pidhi Ghadavitana by Pravin Dawane
Navin Pidhi Ghadavitana by Pravin Dawane
Couldn't load pickup availability
परमपूज्य साने गुरूजींच्या एका वचनाने मी ऐन तारुण्यात, अध्यापनाच्या आरंभात प्रभावीत झालो; तो प्रभाव दिवसेंदिवस वाढतच गेला.
साने गुरूजी म्हणाले होते, 'नवी पिढी घडविण्यासाठी समाजातील जो घटक राबतो, मग तो पालक, शिक्षक किंवा सामाजिक भान असणारा कुणीही कार्यकर्ता असो, त्याचे हात रात्री परमेश्वर हातात घेऊन चेपतो; त्यावर पुंकर घालतो; आणि मग पुन्हा नव्या ताजेपणाने तो शिक्षक, पालक नव्या जोमाने कार्याला लागतो.' त्याच श्रद्धेने केलेले हे लेखन आहे. नवी पिढी तनामनाने सुदृढ झाली तरच हे राष्ट्र अभंग टिकणार आहे. म्हणूनच आपली भारतीय नवी पिढी संपवण्याचे जे अघोषित युद्ध सुरु आहे, त्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून तयार असायला हवे-त्याच ध्यासातला हा एक भाग- हे पुस्तक 'नवी पिढी घडविताना-'!

