Navinya Prakashan
Ovi Arogyachi by Vaidya Suchitra Kulkarni
Ovi Arogyachi by Vaidya Suchitra Kulkarni
Couldn't load pickup availability
वास्तविक आपलं आरोग्य उत्तम राखणं ही आपली जबाबदारी आहे. ती डॉक्टरवर, राष्ट्रावर किंवा विमा कंपनीवर कशी टाकता येईल? टाकली तरी या सर्वांचं काम आपण आजारी पडल्यावर सुरू होतं. म्हणजे आग लागलेली असते, ती विझवायला त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण तोपर्यंत जी जाळपोळ होते त्याचं काय ? आरोग्याचं अजिबात नुकसान होऊ द्यायचं नसेल किंवा ते कमी करायचं असेल तर आपल्याला स्वतःलाच आरोग्य या विषयावर काम करायला हवं. त्यासाठी - 'आरोग्य ही बाजारात मिळणारी, गोळ्या खाऊन पुन्हा प्राप्त होणारी गोष्ट नाही. आपल्याच रोजच्या व्यवहार-रूपी तपातून प्राप्त होणारं ते एक वरदान आहे.' हे सत्य आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरलं जायला हवं.
हीच या लेखनामागची प्रेरणा आहे.
ईश्वर कृपेने अधिकाधिक व्यक्तींना आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य प्राप्ती होवो हीच प्रार्थना. श्रीकृष्णार्पणमस्तु । इदं न ममं ।
नावीन्य प्रकाशन

