Navinya Prakashan
Prakashjhot by Jayant Marathe
Prakashjhot by Jayant Marathe
Couldn't load pickup availability
पतधोरण म्हणजे काय आणि त्याचा दैनंदिन व्यवहारांशी कसा संबंध येतो हे सर्वसामान्य वाचकां पर्यंत पोचवावे, हा हेतू मनात होता. आता आपण नेहमी वृत्तपत्रांतून, टीव्हीच्या माध्यमातून घरे महागणार, गृहकर्जे हप्ते वाढले किंवा वाहन कर्जे महाग अथवा घर घेणे सामान्यांच्या आवाक्यात, अशा प्रकारच्या बातम्या वाचतो किंवा पाहातो. तर ही प्रक्रिया काय असते किंवा कोरोना सारख्या महामारीत टाळेबंदीचा परिणाम व त्यातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला, रोजगाराला पुनर्जिवितच नव्हे तर गतिमान करण्यासाठी कसे आणि काय उपाय योजना केल्या गेल्या आणि केल्या जात आहेत या सर्वांची रिझर्व्ह बँक व पत धोरण याचे काय नाते आहे ते स्पष्ट करण्याचा व कोरोना काळात देशात काय घटना घडल्या व अर्थव्यवस्था २०१७ ते २०२२ या काळात कशी होती. याबाबतची वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न !

