Navinya Prakashan
Rafinama bu Issac Mujawar
Rafinama bu Issac Mujawar
Couldn't load pickup availability
हिंदी सिनेमा संगीताचे शहंशाह-ए-तरन्नुम' असं संबोधले गेलेले मोहम्मद रफी आपल्या सुस्पष्ट, कोमल, मखमली गायकीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांचं नाव उच्चारताक्षणी एक उच्च प्रतीची भावना मनात निर्माण होते. त्यामुळेच अवघ्या संगीतविश्वाने त्यांना भरभरून प्रेम दिलं. संगीत क्षेत्रातील आपल्या अलौकिक कर्तृत्वाने रसिकांच्या चिरस्मरणात असलेल्या रफी साहेबांचा जन्म लाहौर पंजाबमधील कोटला सुल्तानाबादचा. रफी साहेबांना त्यांच्या बालवयात एका फकिराने आपल्या आवाजाने मोहित केलं होतं. संगीताच्या प्रति मोह कदाचित त्यांना त्या फकिराच्या आवाजामुळेच निर्माण झाला होता. रफी साहेब त्या फकिराच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत आणि त्याच्या मागे फिरत. फकिराची ती गाणी गाताना छोट्या रफी साहेबांच्या मनात खास भक्तिभाव निर्माण व्हायचा, ते पाहून त्या फकिराने रफी साहेबांना मनापासून आर्शीवाद दिला, 'बेटा एक दिन तू बडा गायक बनेगा.' आणि खरंच त्या फकिराची भविष्यवाणी खरी ठरली. पुढे हिंदी सिनेमा संगीतात रफी साहेबांनी आपल्या गायनाचे सुवर्णयुग निर्माण केले. सदर पुस्तक त्या साऱ्या रोचक इतिहासाचा आलेख आहे.

