Navinya Prakashan
Ratragandhaar by Rahul Kale
Ratragandhaar by Rahul Kale
Couldn't load pickup availability
'काय जगलास?' असं उत्तररात्री एखाद्या फकिराने विचारलंच तर त्याला चांदण्यांनी भरलेलं आभाळ दाखवता येईल।
पेटीत राखून ठेवलेल्या चांदण्यांचे कोळसे होतात म्हणे!
त्या उत्तररात्रीसाठी, आपल्यातल्याच एका अलिप्त फकीरासाठी हा सगळा प्रपंच !
राहुल काळे
राहुल काळे या माझ्या कवी मित्राचा पहिलाच संग्रह प्रकाशित होतो आहे. 'मित्राचा काव्यसंग्रह' यासोबतच एक चांगली कविता दाखल होते आहे याचाही हर्ष आहे. विचारांची आणि लिखाणाची राहुलची आपली अशी एक शैली आहे. आपल्या मनातल्या अनेक व्यक्त आणि अव्यक्त विचारांना आणि विषयांना त्याची लेखणी स्पर्श करते. एखाद्या निवेदनासारखी ही कविता बोलते आणि ऐकू येते. गेली कित्येक वर्षे मी या कविता ऐकत आलो आहे. त्या व्यतिरिक्तही अनेक नवीन जोमदार कविताही या काव्यसंग्रहात भेटल्या. आनंद वाटला की वाढतो तसेच कवितेचेही आहे !! या कविता आता अनेकांच्या सांगाती होतील !! राहुलच्या काव्यसंग्रहाचे सर्व रसिक हार्दिक स्वागत करतील असा विश्वास आहे !!

