Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Sahyadritil Gad Durganchi Bhatkanti by Sushil Dudhane

Sahyadritil Gad Durganchi Bhatkanti by Sushil Dudhane

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

आमचे मित्र सुशिल दुधाणे गेली अनेक वर्ष सह्याद्री आणि महाराष्ट्रातील गडकोटांची भटकंती करीत आहेत. या भटकंतीतील अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी अनेक लेख आणि ग्रंथांचे लेखनही केलेले आहे. घाट वाटा, सह्याद्रीतील घाट वाटा आणि सह्याद्रीतील गड-दुग्रांची भटकंती हे ग्रंथ त्यांनी सिद्ध केले आहेत. या ग्रंथात त्यांनी किल्ल्यांचे प्रकार, किल्ल्यांचे वैशिष्ट्ये, किल्ले का पाहावे? किल्ल्यावर जात असताना घ्यावयाची काळजी ? किल्ल्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात त्यांनी पुणे, नाशिक, सातारा, सांगली, नगर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्यांतील जवळजवळ ४० किल्ल्यांचा इतिहास आणि समग्र माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ल्यांविषयी ही माहिती देत असताना किल्ले कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात आहे याची माहिती सांगून तेथे जाण्याचे मार्ग ही सांगितले आहेत. किल्ल्यांची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे. किल्ले पायथ्यापासून किती उंच आहे. हे गुगलच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे. किल्ल्यांच्या परिसरातील वनस्पती, प्राणी, घाट-वाटा हेही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा ग्रंथ सामान्यातील सामान्य वाचकांना त्या किल्ल्यांवर जाण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. आणि त्या किल्ल्यांवर जाण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. मला निश्चित खात्री आहे की गडप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहास प्रेमी या ग्रंथाचे स्वागतच करतील.

View full details