Navinya Prakashan
Sahyadritil Ghatwata by Sushi Dudhane
Sahyadritil Ghatwata by Sushi Dudhane
Couldn't load pickup availability
महाराष्ट्र म्हटलं की सह्याद्री अन सह्याद्री म्हटलं की महाराष्ट्र हे नातं तस जुनंच. याची ऊंची वाढली ते येथील घाट वाटांनी. याच वाटेवर प्राचीन काळात संस्कृतीच्या लेण्या कोरल्या गेल्या व पुढील काळात साम्राज्य रक्षणाच्या, विस्ताराच्या दृष्टीने गडकोट उभे राहिले. सह्याद्री अनुभवायच तर येथील घाट वाटा समजून घेणे महत्त्वाचे ठरते. राजेशाही संपुष्टात आली तरी त्याच्या पाऊलखुणा समजून घेण्यासाठी सह्याद्रीचे भटके फिरत असतात, पाऊलखुणा धुंडाळत असतात. अश्याच भटक्यांपैकी एक नाव म्हणजे सुशिल दुधाणे. इतिहासाचा मागोवा घेत घेत प्राचीन वाटेवर फिरत शोधक नजरेतून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणाऱ्या नवीन वाटांचा शोध लावणे, यातच रमणे हेच जगण्याचं ध्येय व उद्दीष्ट. सुटीच्या दिवशी मौज मजा आराम सोडून हा माणूस भल्या पहाटे पहाटे सह्याद्रीत फिरस्त्या सारखं धावत असतो. भूक इतकी मोठी की स्वतःची तहान भूक विसरून नवीन वाटांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी धावणारा. नुकतेच ५० पेक्षाही अधिक घाट वाटांचा मागोवा घेणारा ग्रंथ प्रकाशित झाला. थांबतील ते सह्याद्रीचे भटके कुठले. पुन्हा नव्या दमाने वाटा शोधून अल्पावधीतच दुसरा ग्रंथ सह्याद्री समोर येत आहे. आपल्या सारख्या सह्यप्रेमीमुळे सह्याद्री खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला समजेल यात शंकाच नाही. सुशिल भाऊंना पुढील वाटचालीस सह्याद्री एवढ्या शुभेच्छा!

