Navinya Prakashan
Samanvayatun Samagratekade by Shashank Kulkarni
Samanvayatun Samagratekade by Shashank Kulkarni
Couldn't load pickup availability
सगळीच गणिते बरोबर येत नाही. काही चुकतात, काही सुटतात. काही गणिते आपण सोडवतो, पण उत्तरापर्यंत पोहचू शकत नाही. अशी गणिते मग अपुरी राहतात. पण या साऱ्या प्रक्रियेमध्ये आयुष्य मात्र थांबत नाही. ते सरकत राहते. घड्याळाच्या काट्यांबरोबर पुढे पुढे पोहचत जाते. कधी खाचखळगे, तर कधी अगदी सुरेख पक्का राजमार्ग. आयुष्याच्या या प्रवासात रस्त्यांचे आकार, पद्धती, प्रकार सारे काही बदलत जाते. स्थिर राहतो तो त्यांच्यामध्ये होणारा नकळत पण अनिवार्य असणारा बदल. त्याला आपण कसे सामोरे जातो, यावरच जीवनाची खरी गुणवत्ता अवलंबून असते. या बदलाला सक्षमपणे व यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी आपण समग्र आहोत याची अनुभूती वेळीच झाली पाहिजे, ही अनुभूती समन्वय साधल्याशिवाय साधता येत नाही. म्हणूनच 'समग्रता' हे साध्य असते आणि 'समन्वय' हे साधन. हे साधन कसे, कुठे आणि किती वापरायचे हे आपल्याला समजावे, उमजावे व यातून आपण सर्वांनी आपल्या सर्वांमध्येच नैसर्गिकरीत्या आस्तित्वात असणाऱ्या समग्रतेकडे वाटचाल करावी, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हीच या विचारयज्ञाची सार्थकता आहे.

