Navinya Prakashan
Samartha Netrutva by Madhav Shreekant Killedar
Samartha Netrutva by Madhav Shreekant Killedar
Couldn't load pickup availability
मनुष्य प्राण्याला नेतृत्व करण्याची संधी मिळो अथवा न मिळो, वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक मानव हा स्वतःपुरते तरी नेतृत्व करतच असतो. देहपातळीवर मनुष्य त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात नेतृत्व करतच असतो. वैयक्तिक पातळीवर मानवी जीवनातील समर्थ नेतृत्व म्हणजे त्याने स्वतःच्या आत्म्याला शरण जाणे होय! कारण, इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असावे, मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक आहे. बुद्धीवर आत्म्याचे नियंत्रण अत्यावश्यक आहे आणि अशाप्रकारे मानवी जीवनात परमात्म्याचे समर्थ नेतृत्व निर्माण करणे गरजेचे आहे.
समर्थ नेतृत्व ह्या पुस्तकात मी मानवी जीवनातील कर्मविपाक सिद्धांतही मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. तसेच प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद आणि भगवान नरसिंह. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस ह्यांनी आदर्शवत निर्माण केलेले समर्थ नेतृत्व ह्याविषयी मतं मांडली आहेत..

