Navinya Prakashan
Sangitachua Va Chitrakalechya Duniyet by Pt Sujan Rane
Sangitachua Va Chitrakalechya Duniyet by Pt Sujan Rane
Couldn't load pickup availability
पं. सुजन राणे
पं. सुजन राणे हे एक व्यावसायिक गायक व चित्रकार आहेत. त्यांना किराणा घराण्याचे प्रसिद्ध गवई पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडून दीर्घ तालीम लाभली आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये आपलं गायन सादर केलं आहे. त्यांपैकी नावाजलेल्या संस्था 'नेहरू सेंटर लंडन', 'बनारस हिंदू विश्वविद्यालय' - वाराणसी, 'कला अकॅडमी' पणजी, गोवा, 'स्वामी विवेकानंद केंद्र'- कन्याकुमारी व 'आय. टी. सी. संगीत रिसर्च अकॅडमी' कलकत्ता येथे. शिवाय त्यांचं 'Learning Hindustani Classical Vocal Music' हे पुस्तक इंग्लडच्या केंब्रिज विश्वविद्यालय, ऑक्सफर्ड विश्वविद्यालय व अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ यु, एस. काँग्रेसमध्ये स्वीकारलं गेलं आहे. त्याचप्रमाणे ते एक उत्तम चित्रकार आहेत. गेल्या ४० वर्षांत त्यांनी अनेक व्यक्तिचित्रं काढली आहेत. त्यांपैकी खालील चित्रं महत्त्वाची आहेत.
अमेरिकन रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर पीटर इन्व्हरसो न्यू जर्सी, अमेरिका., स्वामी चिन्मयानंद-चिन्मय मिशन., प्लॅन्सबरो-न्यू जर्सी, अमेरिका., भारतीय रिझर्व बँकेचे उच्च अधिकारी श्री. रमेश प्रधान-न्यू जर्सी, अमेरिका.
खालील भारतीय व्यक्तींची व्यक्तिचित्रं बनारस हिंदू विश्वविद्यालय व महाराजा सवाजीराव विश्वविद्यालय, बरोडा इथे आहेत.
उस्ताद अब्दुल करीम खान, उस्ताद बिस्मिल्ला खान, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, श्रीमती हिराबाई बडोदेकर, श्रीमती गंगुबाई हनगल, श्रीमती मोगुबाई कुर्डीकर, पंडित
फिरोज दस्तूर, उस्ताद विलायत खान, उस्ताद तिर्रख्वा व इतर. तसेच त्यांनी रंगवलेलं स्वामी विवेकानंद यांचं मोठं व्यक्तिचित्र त्यांच्या कन्याकुमारी केंद्रात आहे.

