Navinya Prakashan
Shailendra Ani Sahir - Shabdachaitanyache Kimayagar by Vilas Deshmukh
Shailendra Ani Sahir - Shabdachaitanyache Kimayagar by Vilas Deshmukh
Couldn't load pickup availability
शैलेंद्र आणि साहिर
हिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषतः जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी. लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने "गाणी सांगणारं " ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा.
वैभव जोशी
प्रसिद्ध कवी आणि गीतकार

