Navinya Prakashan
Shree Swami Samartha Krupankit Shishyanchi Mandiyali by Prof Dr Yashwantrao S Patil
Shree Swami Samartha Krupankit Shishyanchi Mandiyali by Prof Dr Yashwantrao S Patil
Couldn't load pickup availability
लेखक
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थमहाराजांनी त्यांच्या अवतार काळाते सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. 'सम सकला पाहू' हा दृष्टिकोन कायम ठेवला दया, क्षमा, शांती, करुणा आणि सत्य यांचा नेहमीच आग्रह धरला.
ही पंचतत्त्वे रुजवण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी त्यांनी काही लीला, चमत्कारही केले. त्याद्वारे 'सत्यम्, शिवम्, सुंदरम्' या त्रिकालाबाधित तत्त्वांची जोपासना आणि उपासना केली.
कर्मकांड, कालबाह्य रूढी, परंपरा, गंडे, दोरे, धागे यांचा धिक्कार करीत.
ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोगाच्या समन्वयास प्राधान्य दिले. मानवजातीच्या उद्धाराचे हे तत्त्वज्ञान श्री स्वामींनी त्यांच्या 'कृपांकित' शिष्यांत संक्रमित केले. त्या शिष्यांनीही ती परंपरा पुढे तशीच चालू ठेवली.
हे सर्व ओघवत्या, साध्या, सोप्या, सरळ आणि आध्यात्मिक रसाळ भाषेत लेखकाने 'श्री स्वामी समर्थ कृपांकित शिष्यांची मांदियाळी' या पुस्तकात मांडले आहे.
म्हणूनच हे पुस्तक सर्वांनाच उद्धारक आणि प्रेरक ठरेल यात शंका नाही.
प्रकाशक

