Navinya Prakashan
Striyanche Arogya Ani Ayurved by Vaidya Parikshit Shevde
Striyanche Arogya Ani Ayurved by Vaidya Parikshit Shevde
Couldn't load pickup availability
माझ्याकडील रुग्णांतील स्त्रियांची बहुसंख्या पाहताच त्यांच्यासाठी असे काही खास लिहायला हवे असल्याचे मनापासून वाटू लागले; त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक. पुस्तक लिहिताना स्त्रियांच्या शारीरिक आरोग्यासहच मानसिक, भावनिक आणि लैंगिक आरोग्याबाबतही आवर्जून विचार केल्याचे सूज्ञ वाचकांच्या सहज लक्षात येईल. या प्रत्येक पैलुत आयुर्वेद कसा उपयोगी ठरू शकतो हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. तसे करताना आवश्यक तेथे थेट आयुर्वेदातील संदर्भच नमूद केले आहेत. महिलांच्या शरीररचनेपासून विविध व्याधींबाबत उल्लेख करताना पाश्चात्य वैद्यकाचे मतदेखील मांडून पुस्तकाला सर्वकष करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रिविशिष्ट आसने, पाककृती, औषधी वनस्पती यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे.

